Aashram : ‘आश्रम’साठी बॉबी देओल, प्रकाश झा आणि निर्मात्यांना जोधपूर कोर्टाची नोटीस, ‘या’ दिवशी सुनावणी ! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) या वेब सीरिजचा पहिला सीजन प्रचंड गाजला. यानंतर याचा दुसरा सीजन आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड (Aashram Chapter 2 – The Dark Side) 11 नोव्हेंबर 2020 रोजी (वार बुधवार) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअर (MX Player) वर रिलीज झाली होती. आता जोधपूर न्यायालयानं बॉबी देओल आणि शोचे निमार्ता तसेच डायरेक्टर यांना लीगल नोटीस पाठवली आहे. याची सुनावणी 11 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. सीरिज रिलीज होण्यापूर्वीच वाद सुरू झाला होता.

या सीरिजविरोधात सोशलवर कॅम्पेन चालवलं गेलं होतं. ही सीरिज धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

याआधीही गेल्या आठवड्यात करणी सेनेनं (Karni Sena) या वेब सीरिजवर आक्षेप घेतला होता. करणी सेना राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजीत सिंह यांनीही आश्रमला लीगल नोटीस पाठवली होती. यात ही सीरिज हिंदुंच्या भावना दुखवणारी आहे. येणाऱ्या पिढीला हिंदू धर्माची नकारात्मक प्रतिमा दाखवण्याची प्रयत्न केला गेला आहे. यात हिंदू संस्कृती, परंपरांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे असा आरोप करण्यात आला होता. सीरिजमधील काही सीन्सचं उदाहरण देखील दिलं होतं.

जेव्हा सीरिजचा पहिला टीजर समोर आला होता. त्यानंतर यावर असेच आरोप लावले जात आहेत. पहिल्या सीजननंतरच लोकांचा संताप सोशलवर पाहायला मिळाला होता.

परंतु पहिल्या सीजनच्या ट्रेलरच्या आधीच एक डिस्क्लेमर देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. यात मेकर्स म्हणाले होते की, आम्ही साधू संतांच्या परंपरेवर विश्वास ठेवतो. सीरिजची स्टोरी काल्पनिक आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

आश्रम सीरिजबद्दल बोलायचं झालं तर या सीरिच्या पहिल्या सीझनला 400 मिलियन पेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. खुद्द प्रकाश झा यांनीची याबाबत माहिती दिली होती. पहिला सीजन हा 28 ऑगस्ट 2020 रोजी एम एक्स प्लेअरवर रिलीज झाला होता. बुधवारी (दि 11 नोव्हेंबर 2020) याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही सीरिजला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.