Netflix Top 10 : अल्लू अर्जुनला बाजूला सारत कियारा आडवाणीचा ‘गिल्टी’ टॉपवर, ‘हाइस्ट’नं दिली चाहूल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नेटफ्लिक्स रोजच टॉप 10 लिस्ट जारी करत असतं. ही लिस्ट व्ह्युअरशिपवर आधारीत असते. या टॉप 10 लिस्टमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. नेटफ्लिक्सवर अलीकडेच रिलीज झालेला कियारा आडवाणी स्टारर गिल्टी हा सिनेमा टॉपवर आला आहे. थ्रिलर वेब सारिज मनी हाइस्टनं टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे.

अल्लू अर्जुनच्या सिनेमाला बाजूला करत गिल्टी टॉपवर
करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार करण्यात आलेला गिल्टी हा सिनेमा टॉपवर आहे. हा कियारा आडवाणीचा दुसरा नेटफ्लिक्स ओरिजिनल प्रोजेक्ट आहे. याआधीही कियारा लस्ट स्टोरीजमध्ये दिसली आहे. दीर्घकाळापासून टॉपवर सुरू असलेला अल्लू अर्जुनचा सिनेमा Ala Vaikunthapurramuloo आता तिसऱ्या नंबरवर गेला आहे. पीटर बर्गचा स्पेंसर कॉन्फिडेंशियल हा सिनेमा दुसऱ्या नंबरवर आहे. हाही नेटफ्लिक्स ओरिजिनल सिनेमा आहे.

द बॉडी हा इम्रान हाश्मीचा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. अमित टंडनचा कॉमे़ी शो पाचव्या क्रमांकावर आहे. हे दोन्हीही प्रोजेक्ट गेल्या आठवड्यापासून टॉप 5 मध्ये समाविष्ट आहेत. हे दोन्हीही प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर चाहत्यांना आवडले आहेत.

मनी हाइस्टनं इंडिया टॉप 10 मध्ये आपली जागा बनवली आहे. या वेब सीरिजचा चौथा पार्ट 3 एप्रिल 2020 रोजीज रिलीज केला जाणार आहे. टॉप 10 मध्ये फ्रेंड्सही कायम आहे. अर्जुन कपूरचा सिनेमा पानीपत टॉप 10 मध्ये समाविष्ट आहे.