अनुष्का शर्माची वेब सीरिज ‘पाताल लोक’विरोधात आणखी एक तक्रार, मंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि एक प्रोड्युसर अनुष्का शर्मानं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. या सीरिजला चाहत्यांपासून तर क्रिटीक्स पर्यंत सर्वजण हिट म्हणत आहे. खास करून स्टोरी आणि अ‍ॅक्टींग सर्वांनाच आवडली आहे. असं असतानाही सीरिज आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. गोरखा समुदाय आणि उत्तर प्रदेशचे भाजप आमदार यांच्या तक्रारीनंतर आता सिक्कीमचे लोकसभा खासदार इंद्र हंग सुब्बा यांनी या वेब सीरिजवर आक्षेप घेतला आहे. इंद्र यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित सीरिजच्या विरोधात अ‍ॅक्शन घेण्याची मागणी केली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, इंद्र यांनी पत्रात लिहिलं आहे की, “हे प्रकरण अ‍ॅमेझॉन प्राईमवरील ओरिजनल वेब सीरिज पाताल लोकमधील दुसऱ्या एपिसोडमध्ये नेपाली बोलणाऱ्या समुदायाविरोधात केले गेलेल्या जातीवादी कमेंटशी संबंधित आहे. भारतीय घटनेच्या 8 व्या यादीत सहभागी असणाऱ्या 22 भाषांपैकी एक नेपाळी भाषा आहे. 10.5 मिलियनहून अधिक लोक नेपाळी भाषा मातृभाषा म्हणून बोलतात. अशात या सीरिजमध्ये वापरलेल्या अपमानकारक आणि आक्षेपार्ह कमेंटनं समुदायातील लोकांच्या भावना तर दुखाल्या गेल्याच आहेत. याशिवाय सीरिजनं वर्णद्वेषाच्या स्टीरियोटाईपचं उदाहणही सेट केलं आहे.”

सीरिजविरोधात अ‍ॅक्शन घेण्याची मागणी करत इंद्र पुढे म्हणतात, “मी बेजबाबदार आणि असंवेदनशील कृत्याचा निषेध करतो. याचिकेच्या माध्यमातून या समुदायानं केलेल्या अपीलला मी बिन शर्त समर्थन करत पुढे नेऊ इच्छित आहे. यात मागणी केली गेली आहे की, सबटायटल ब्लर केले जावेत आणि त्याचा ऑडिओही एडिट करून पुन्हा ती अपलोड केली जावी. इतकंच नाही तर निर्मात्यांनीही माफी मागावी.

याआधीही लॉयर गिल्ड मेंबरचे गिल्ड चे सदस्य वकिल वीरेन सिंह गुरुंग यांनी अनुष्काला एक लीगल नोटीस पाठवली आहे. 18 मे रोजी पाठवलेल्या या नोटीशीत आरोप करण्यात आला आहे की सुदीप शर्मानं लिहिलेल्या या सीरिजमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केला आहे यामुळं गोरखा समाजाचा अपमान झाला आहे.

वीरेन यांचं म्हणणं आहे की, पाताल लोकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये लेडी पोलीस नेपाळी मुलीला जातीवादी शब्दाचा वापर करते. जर फक्त नेपाळी शब्दाचा वापर केला असता तर अडचण नव्हती. परंतु त्यानंतर जो शब्द वापरला जातो तो स्विकार केला जाणार नाही. अनुष्का शर्मा याची निर्माता असल्यानं तिला ही नोटीस पाठवली आहे.