Z-5 वर लवकरच रिलीज होणार राजकुमार राव स्टारर ‘ओमेर्टा’, कंधार हायजॅकमध्ये सुटलेल्या आतंकवादी सईद शेखची कहाणी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 1999 साली इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट 814 ही हायजॅक करण्यात आली होती. त्या काळात अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. हायजॅकच्या बदल्यात ज्या आतंकवाद्यांना सोडण्याची मागणी केली गेली त्यापैकीच एक नाव अहमद उमर सईद शेख आहे. याच उमर शेखची कहाणी राजकुमार रावच्या ओमेर्टा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा आता लवकरच ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी 5 वर स्ट्रीम होणार आहे.

हंसल मेहता यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे ज्यात असं सांगिलतं आहे की हा सिनेमा जूनमध्ये रिलीज केला जाणार आहे. मेहता यांनी लिहिलं की, “मी देखील तेवढाच आश्चर्यचकित झालो हे जेवढे बाकी लोक झाले आहेत. परंतु चला ओमर्टानं अखेर ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला शोधून काढलं. या सिनेमात खूप, पॅशन एफर्ट्स, आणि मेहनत आहे.”

अनुराग कश्यपनंही यासंदर्भात ट्विट केलं आहे. झी 5नं देखील याची पुष्टी केली आहे की हा सिनेमा झी 5 वर लवकरच रिलीज होणार आहे. 2018 मध्ये भारतात रिलीज झालेल्या सिनेमाचं क्रिटीक्सनं खूप कौतुक केलं होतं. फिल्म फेस्टीवलमध्येही याचं खूप कौतुक झालं.