अनुष्का शर्माच्या ‘पाताल लोक’ला बॉयकॉट करण्याची मागणी ! लोक म्हणत आहेत ‘हिंदू-मुस्लिम’विरोधी सीरिज

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार आणि एक प्रोड्युसर अनुष्का शर्मानं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. या सीरिजला चाहत्यांपासून तर क्रिटीक्स पर्यंत सर्वजण हिट म्हणत आहे. खास करून स्टोरी आणि अ‍ॅक्टींग सर्वांनाच आवडली आहे. असं असतानाही अनेकांनी या सीरिजबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी बॉयकॉट करण्याची अपील करत प्रोड्युसर अनुष्का शर्मानं माफी मागावी असं म्हटलं आहे.

पहिला पक्ष
सीरिजला विरोध करणारे दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष म्हणत आहे की, यात काही सीन्स असे आहेत जे हिंदुंच्या भावना दुखवत आहेत. काही युजर्स असेही म्हणत आहेत की, या सीरिजमध्ये सीबीआय, सरकार, पोलिस आणि सर्व हिंदूंना वाईट दाखवलं आहे. ही सीरिज बॉयकॉट करायला हवी. या पक्षानं ही सीरिज हिंदू विरोधी असल्याचंही म्हटलं आहे.

https://twitter.com/shivani_nannu/status/1261680399056396288

दुसरा पक्ष
या सीरिजला विरोध करणारा दुसरा पक्ष असा आहे जो ही सीरज इस्लाम विरोधी आहे असं म्हणत आहे. एका युजरनं असं लिहिलं की, अनुष्कानं बिनशर्त माफी मागायला हवी. यामधून ते सीन्स काढून टाकायला हवे जे प्रमुख इस्लामिक पुस्तकांना आतंकवादी साहित्याच्या रुपात दाखवून शुट करण्यात आले आहेत.

https://twitter.com/SharjeelUsmani/status/1261646303450107905

स्टोरी
पाताल लोक एका पोलीस अधिकाऱ्याची कहाणी आहे. नाव आहे हाथीराम चौधरी(जयदीप अहलावत) दिल्लीच्या आउटर जमुनापार ठाण्यात पोस्टींग आहे. हाथीरामच्या व्हॉट्स अ‍ॅप युनिव्हर्सिटीनुसार या जगाचे तीन भाग आहेत. एक स्वर्ग लोक, एक धरती लोक आणि एक पाताल लोक जिथे राहतात. पाताल लोक म्हणजे त्याची पोस्टींग आहे. हथौडा त्यागी, टोपी सिंह, चीनी आणि कबीर एम दिल्लीतल्या एका ब्रिजवर अटक होतात. यांच्यावर मीडिया टायकून संजीव मेहरा(नीरज काबी) च्या हत्येचा कट केल्याचा आरोप आहे. संजीव फेमस टीव्ही जर्नलिस्ट आहे. हाथीरामला ही केस दिली जाते. हाथीरामला पोलीस डिपार्टमेंटसोबत कुटुंबालाही दाखवायचं आहे की, तो हिरो आहे. आता हाथीरामला हे जमतं की, नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ही सीरिज पहावी लागेल.