Tandav Teaser : ‘इस देश में जो प्रधानमंत्री है, वही राजा है’, सैफ अली खान-डिंपल कपाडिया यांच्या ‘तांवड’चा टीजर Out !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) सीरिजचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी या सीरिजचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी रिलीज होणार आहे.

सीरिजमध्ये नेमकं काय ?

सैफ अली खान या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे. सैफ यात पंतप्रधानांच्या मुलाचा रोल साकारणार आहे. पीएमची खुर्ची मिळवण्यासाठी सैफ कोणत्या पातळीला जातो याबद्दल स्टोरी यात आहे. एका देशाचा पंतप्रधान हाच कसा देशाचा राजा असतो हे यात दाखवण्यात आलं आहे.

स्टारकास्ट बद्दल थोडक्यात…

तांडव या सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशू धूलिया यांच्यासोबतच कृतिका कामरा, सारा जेन डियास, दीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद जीशान आयुब, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पहुजा आणि शोनाली नागरानी असे काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अली जफर आणि डिंपल कपाडिया यांचा डिजिटल डेब्यू

या सीरिजद्वारे अली अब्बास जफर आणि डिंपल कपाडिया डिजिटल डेब्यू करणार आहेत. सेक्रेड गेम्स 2 नंतर सैफ पुन्हा एकदा वेब स्पेस मध्ये परत येतना दिसणार आहे.