The Girl On The Train Trailer : चित्रपटगृहाऐवजी नेटफ्लिक्सवर येणार परिणीती चोपडाचा चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, पहा ट्रेलर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस पॅनडेमिकमुळे 2020 मध्ये आपण पाहिले की, अनेक मोठ्या आणि चर्चित चित्रपटांनी थिएटर बंद असल्याने ओटीटी रिलीजचा मार्ग निवडला होता. हे चित्रपट प्रामुख्याने अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स आणि डिज्ने प्लससारख्या प्लॅटफॉर्मवर रिलिज करण्यात आले होते. हे सत्र 2021 मध्ये सुद्धा जारी आहे. नव्या वर्षात याची सुरूवात परिणीती चोपडाचा चित्रपट द गर्ल ऑन द ट्रेनने झालीआहे, जो चित्रपटगृहाऐवजी नेटफ्लिक्सवर रिलिज केला जात आहे.
Join @ParineetiChopra on a train journey like never before.
Warning: Board at your own risk. @ParineetiChopra @aditiraohydari @IamKirtiKulhari @avinashtiw85 @tota_rc @ribhudasgupta @Shibasishsarkar @RelianceEnt @amblin @SHAMAUN @ZeeMusicCompany pic.twitter.com/HQs1OHo2eK— Netflix India (@NetflixIndia) January 13, 2021
बुधवारी नेटफ्लिक्सने याचा ट्रेलर जारी करून रिलिज डेटचा खुलासा केला. द गर्ल ऑन द ट्रेन 2021 चा पहिला चर्चित चित्रपट आहे, जो थिएटरऐवजी थेट ओटीटी प्लेटफॉर्मवर आणला जात आहे. नेटफ्लिक्सने ट्रेलर शेयर करत लिहिले आहे की – या आगळ्या वेगळ्या ट्रेन प्रवासात परिणीती चोपडासोबत या. इशारा – आपल्या रिस्कवर ट्रेनमध्ये चढा. 26 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.
द गर्ल ऑन द ट्रेन मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट आहे. हा याच नावाने आलेल्या हॉलीवुड चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये एमिली ब्लंटने लीड रोल केला होता. हॉलीवुड चित्रपट 2015 मध्ये याच नावाने आला, पॉला हॉकिन्स यांच्या कादंबरीचे अडेप्टेशन आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता यांनी केले आहे. रिभु यांनी नेटफ्लिक्ससाठी बार्ड ऑफ ब्लड नावाने सीरीज यापूर्वी दिग्दर्शित केली आहे, ज्यामध्ये इम्रान हाश्मीने लीड रोल केला होता. या सीरीजची निर्मिती शाहरुख खानने केली होती.
द गर्ल ऑन द ट्रेन ची कथा एक मुलगी मीराच्या अवती-भवती फिरते, जी रोज ट्रेनने प्रवास करताना एका कुटुंबाला आनंदी जीवन जगताना पाहते. पण दिवस असे काही होते की, तिचे स्वत:चेच जीवन बदलून जाते. चित्रपटात परिणीतीशिवाय आदिती राव हैदरी, किर्ती कुल्हरी आणि अविनाश तिवारी महत्वाच्या भूमिकेत दिसतील. द गर्ल ऑन द ट्रेन मागील वर्षी मेमध्ये रिलिज होणार होता, परंतु कोरोना पॅनडेमिकमुळे पोस्टपोन करण्यात आला होता.