‘या’ Platform वर रिलीज होणार उर्वशी रौतेलाचा ‘व्हर्जिन भानुप्रिया’, शेअर केला फर्स्ट लुक !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेला हिनं तिचा आगामी कॉमेडी सिनेमा व्हर्जिन भानुप्रिया सिनेमाच्या रिलीज प्लॅटफॉर्मबद्दलचा संशय दूर केला आहे. हा सिनेमा झी 5 वर रिलीज केला जाणार आहे. उर्वशीनं इंस्टावरून यासंदर्भात घोषणा केली आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून सिनेमाचं पोस्ट शेअर करत सर्व माहिती दिली आहे. पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, “स्टोरी कॉलेजला जाणाऱ्या साध्या सरळ मुलीची आहे. तिला तिच्यासाठी एका पार्टनरची गरज आहे. लवकरच रिलीज होत आहे झी 5 वर.” सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी सिनेमा 12 जून रोजी थिएटर मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन होता.

https://www.instagram.com/p/CBkWoWoBaO2/?utm_source=ig_embed

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.