AK vs AK Trailer : अनुराग कश्यपनं सोनम कपूरला केलं किडनॅप, जीव तोडून शोधतोय अनिल कपूर ! यात सर्व खरं असणार (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनिल कपूर (Anil Kapoor) आणि बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्यात सध्या ट्विटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. रविवारी (दि. 6 डिसेंबर 2020) सोशलवर हे घमासान पाहायला मिळालं. अनेकांना प्रश्न पडला होता की, हे नेमकं काय सुरू आहे. हे सर्व त्यांच्या AK vs AK या आगामी सिनेमाची सूचना होती. नेटफ्लिक्स (Netflix) वरील या सिनेमाचं डायरेक्शन विक्रमादित्य मोटवाने (Vikramaditya Motwane) करत आहे. सोमवारी सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची खूप चर्चा सुरू आहे. लोकांन ट्रेलर आवडला आहे.

नेटफ्लिक्सनं याचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे की, यात जे काही होईल ते खरं असेल. AK vs AK मध्ये अनिल कपूर एक फिल्म स्टार बनला आहे. अनुराग डायरेक्टर बनला आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अनिलची मुलगी सोनम कपूर किडनॅप होते. अनिल तिला शोधण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करताना दिसत आहे. अनुरागची व्हिलनची इमेज पाहायला मिळत आहे.

ट्रेलरमध्ये अनिल आणि अनुराग यांच्यातील वादही पाहायला मिळत आहे. स्टेजवर दोघं एकत्र असताना रागाच्या भरात अनुराग अनिलच्या तोंडावर पाणी फेकताना दिसत आहे.

AK vs AK चा ट्रेलर इंटरेस्टिंग आहे. याशिवाय कन्सेप्टही जबरदस्त आहे. ट्रेलर समोर आल्यानंतरही दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरूच आहे. ट्रेलर शेअर करतानाही त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.