Criminal Justice 2 Trailer : ‘मिर्झापूर 2’ नंतर क्रिमिनल जस्टीस 2 मध्ये झळकणार पंकज त्रिपाठी ! पहा ट्रेलर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) नं गुरुवारी (दि 11 डिसेंबर) आपल्या फ्लॅगशिप सीरिज क्रिमिनल जस्टीस : बिहाइंड क्लोज डोर्स (Hotstar Specials – Criminal Justice Behind Closed Doors. Pankaj Tripathi, Kirti Kulhari) चा ट्रेलर रिलीज केला आहे. हा सीरिजचा दुसरा सीजन आहे. क्रिमिनल जस्टीसचा पहिला सीजन खूप यशस्वी ठरला आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) पुन्हा एकदा परतले आहेत. परंतु यावेळी ते खूप गुंतागुंतीची केस लढत आहेत.

क्रिमिनल जस्टीसच्या या दुसऱ्या सीजनमध्ये अनुराधा चंद्रा म्हणजे कीर्ती कुल्हारी हिच्या भोवती सीरिजची स्टोरी फिरताना दिसते जिनं पती विक्रम चंद्रा हिचा खून केला आहे. तिनं कोर्टातही हे मान्य केलं आहे. हीच केस माधव मिश्रा म्हणजेच पंकज त्रिपाठीकडे जाते. त्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि तेही मालदार पार्टीच्या शोधात असतात. यानंतर खरी स्टोरी स्टार्ट होते आणि अनेक रहस्य उलगडत जातात.

क्रिमिनल जस्टीस या सीरिजबद्ल बोलायचं झालं तर यात शिल्पा शुक्ला, अनुप्रिया गोयनका, दीप्ती नवल, आणि जिशु सेनगुप्ता हेही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज 24 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.