Masaba Masaba Trailer : ‘नीना’ आणि ‘मसाबा’ गुप्ताच्या जीवनावरील वेब सिरीज ‘मसाबा मसाबा’, पाहा ट्रेलर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या आयुष्यावर आधारित मसाबा मसाबा शो चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या शो मध्ये नीना आणि मसाबा यांनीच मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर 28 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे, त्यासोबतच मसाबाच्या अभिनयाची सुरुवात देखील होईल. ट्रेलरमध्ये मसाबा गुप्ताची ओळख एका फॅशन डिझायनरच्या भूमिकेमध्ये करून देण्यात आली आहे, जिचे स्वतःचे लेबल आहे आणि तिचे तिच्या आईशी असलेले नाते जरा कॉम्प्लीकेटेड आहे.

नीना गुप्ता याच आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी आणि फराह खानसुद्धा दिसतील, ज्या की विशेष व्यक्तिरेखा म्हणून असतील. मसाबाने इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आहे. मसाबा तिच्या पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहे. तिने लिहिले- शेवटी ते आले आहे. मी माझा ट्रेलर शेअर करून खूप चिंताग्रस्त आहे आणि उत्साहित देखील आहे. या सिरीजची निर्मिती अश्विनी यार्डी यांनी केली असून सोनम नायर दिग्दर्शित करत आहेत.

मसाबा नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि व्हिव्हियन यांनी लग्न केले नव्हते. वयाच्या आठव्या वर्षी मसाबाला टेनिसपटू व्हायचे होते. पण 16 वर्ष वय होता-होता तिचा भ्रमनिरास झाला. मसाबा रियल लाइफमध्ये फॅशन डिझायनर असून तिचे स्वतःचे लेबलही आहे. 2015 मध्ये मसाबाने चित्रपट निर्माता मधु मांटेनाशी लग्न केले. 2018 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला होता.