Web Series & Films in January 2021 : ‘या’ वेब सीरिज आणि सिनेमांनी होणार 2021 ची सुरुवात ! ‘इथं’ पहा यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  2020 मध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात थिएटर बंद असताना अनेक सिनेमे आणि वेब सीरिज हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. लोकांचं घरबसल्या मनोरंजन झालं. आता 2021 मध्ये म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच महिन्यात काही सिनेमे आणि सीरिज लाँच होणार आहेत. याची आपण माहिती घेणार आहोत.

सिनेमे –

1) नेल पॉलिश – 1 जानेवारी 2021 रोजी बग्स भार्गव कृष्ण डायरेक्टेड नेल पॉलिश सिनेमा रिलीज होणार आहे. हा एक इंटेंस कोर्ट रूम ड्रामा आहे. बॉलिवूड स्टार अर्जुन रामपाल यानं यात वकिलाची भूमिका साकारली आहे. मानव कौल आणि आनंद तिवारी हे सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

2) कागज –

सतीश कौशिक डायरेक्टेड कागज हा सिनेमा 7 जानेवारी 2021 रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. या सिनेमा सत्य घटनेवर आधारीत सिनेमा आहे. पकंज त्रिपाठी यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. बॉलिवूड स्टार सलमान खाननं हा सिनेमा प्रोड्युस केला आहे. यात एक इंटरेस्टींग स्टोरी पाहायला मिळणार आहे.

3) मारा –

अभिनेता आर माधवन आणि श्रद्धा श्रीनाथ स्टारर मारा हा सिनेमा 8 जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. हा एक तेलगु सिनेमा आहे. दिलीप कुमारनं सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. चार्ली या मल्याळम सिनेमा हा अधिकृत रिमेक सिनेमा आहे.

4) द व्हाईट टायगर –

प्रियंका चोपडा आणि राजकुमार राव स्टारर द व्हाईट टायगर हा सिनेमा 22 जानेवारी 2020 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. अरविंद अडिगा यांच्या याच नावानं असणाऱ्या बेस्ट सेलिंग कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे. रामिन बहरानीनं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. आदर्श गौरव या सिनेमातून डेब्यू करणार आहे.

वेब सीरिज –

1) तांडव – सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) सीरिजचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी या सीरिजचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी रिलीज होणार आहे.

सैफ अली खान या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे. सैफ यात पंतप्रधानांच्या मुलाचा रोल साकारणार आहे. पीएमची खुर्ची मिळवण्यासाठी सैफ कोणत्या पातळीला जातो याबद्दल स्टोरी यात आहे. एका देशाचा पंतप्रधान हाच कसा देशाचा राजा असतो हे यात दाखवण्यात आलं आहे. या सीरिजद्वारे अली अब्बास जफर आणि डिंपल कपाडिया डिजिटल डेब्यू करणार आहेत. सेक्रेड गेम्स 2 नंतर सैफ पुन्हा एकदा वेब स्पेस मध्ये परत येतना दिसणार आहे.

2) जिद – जिद ही सीरिज 22 जानेवारी 2021 रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. अमित साध या सीरिजमध्ये लिड रोलमध्ये आहे. या सीरिजद्वारे निर्मात बोनी कपूर हे डिजिटल डेब्यू करणार आहेत. अमृता पुरी या सिनेमात फीमेल लिड रोल साकारत आहे.