Yaara Trailer : 4 गुन्हेगारांच्या घट्ट मैत्रीणी कहाणी आहे ‘यारा’ ! इथं पहा ट्रेलर (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सिने निर्माता तिग्मांशु धूलिया याच्या डायरेक्शनमध्ये बनलेला यारा हा सिनेमा 30 जुलै रोजी ZEE 5 वर रिलीज होणार आहे. या सिनेमातील स्टोरी चार कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत आहे. या फ्रेंडशिप डेला हा सिनेमा रिलीज होणार आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

ट्रेलरमध्ये दिसत आहे की, लहानपणापासून मित्र असणारे चार जण गुन्हेगारीतही भागीदार बनतात. चौघांचीही मैत्री खूप मजबूत दाखवली आहे. चौघांना असं वाटत असतं त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसोबतच त्यांच्या मैत्रीमुळंही ओळखलं जावं. परंतु त्याच्या मैत्रीला आयुष्याच्या एका कठिण परीक्षेला सामोरं जावं लागतं. त्यांचं नातं हे आव्हान पेलवण्यासाठी समर्थ ठरतं किंवा नाही याचं उत्तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच मिळणार आहे.

कास्टींग

सिनेमातील कास्टींगबद्दल बोलायचं झालं तर यात विद्युत जामवाल, अमित साध, विजय वर्मा, श्रुती हासन, केनी बासुमतारी आणि संजय मिश्रा आदी कलाकार काम करताना दिसणार आहेत. सिनेमाबद्दल आणखी बोलायचं झालं तर यारा हा सिनेमा फ्रेंच फीचर फिल्म ए गँग स्टोरी चा रिमेक आहे.

फ्रेंडशिप डेला येतोय सिनेमा

विद्युत जामवाल एका स्टेटमेंटमध्ये म्हणाला होता की, “दोस्ती एकमात्र असं सिमेंट आहे जे जगाला जोडण्याचं काम करेल.” हा सिनेमा फ्रेंडशिप डेला येत आहे. सारेच सिनेमाच्या रिलीजला घेऊन खुश आहेत. विद्युत जामवाल यानं त्याच्या इंस्टावरून एक पोस्टही शेअर केली होती जी यारा सिनेमाबद्दल होती.