धक्कादायक ! ‘PUBG’ खेळण्यासाठी ४ मुले १००००० रुपये घेऊन घरातून ‘पसार’

भोपाळ (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – मुलांना लागणारे ऑनलाईन गेमचे व्यसन हे जगभरातील पालकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. या व्यसनापायी कित्येकांनी आपला जीवही गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात भोपाळमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून ‘पबजी’मधील मिशन पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळून गेले. पळून गेलेल्यांपैकी एक मुलगी १५ तर दुसरी १३ वर्षांची असून त्यांच्या एका भावाचे वय ११ वर्षे तर दुसरा केवळ ९ वर्षांचा आहे. हि मुले अत्यंत सधन कुटुंबातील आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण :

ही मुले पबजी खेळत असताना केवळ एकच लाइफलाइन उरली होती. तेव्हा खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी ५०० किलोमीटर अंतर पार करण्याचे ‘टास्क’ या मुलांना दिले गेले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी घरातील सर्व जण झोपले असताना ही मुले रविवारी रात्री एक लाख रुपये एवढी रक्कम घेऊन पळून गेली. गुणा रेल्वे स्थानकावरून त्यांनी ट्रेन पकडली. पालकांना दुसऱ्या दिवशी मुले घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. मुले कोठेच न सापडल्याने त्यांनी अखेर पोलिसांमध्ये तक्रार केली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आसपासच्या रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज ची देखील तपासणी केली.

अखेर गुणा गावापासून २५० किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात मुले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रवासादरम्यान या मुलांनी दोन हजार रूपये खर्च केल्याचं आढळून आलं. मुलांना घरी आणून त्यांची चौकशी केली असता पबजी मिशन पूर्ण करण्यासाठी नाही, तर ग्वाल्हेर येथील मॉल बघण्यासाठी गेलो होतो, असं या मुलांनी सांगितलं. परंतु मुलं मॉल पाहण्यासाठी घरातून पळून गेली असतील यावर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण ही मुले सधन कुटुंबातील असून त्यांना मॉल पाहण्याच आकर्षण झाल्यास त्यांचे पालक त्यांची इच्छा सहज पूर्ण करू शकत होते असे गुणा पोलीस अधीक्षक राहुल लोढा यांनी स्पष्ट केले. या मुलांचे समुपदेशन करून घरच्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय आहे ‘पबजी’ गेम :

प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (Players Unknown Battle Ground) असा या लोकप्रिय गेम चा फुलफॉर्म असून भारतात या गेमवर बंदी आणावी अशी मागणी जोर धरत आहे. अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झालेल्या या गेम वर गुजरातमध्ये एका महिन्यासाठी बंदीदेखील घातली होती. या काळात गेम खेळणाऱ्या १६ लोकांना अटकदेखील झालेली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पबजी गेम मुळे युवकांवर गंभीर मानसिक परिणाम होत असून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. याच वर्षी सलग ६ तास पबजी खेळल्यामुळे मध्यप्रदेश येथील युवकाचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला होता.

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

झोप येत नाही ? मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

न्यायाधीशांच पंतप्रधानांना पत्र, न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद,