फर्ग्युसनकडून कोळसे-पाटलांचं व्याख्यान रद्द , महाविद्यालयात गदारोळ 

पुणे; पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आज सकाळी 11 वाजता माजी न्यायामूर्ती बी जी कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाचं आमंत्रण कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनाने रद्द केलं. बी.जी.कोळसे-पाटील राज्यघटना 1950 ते 2018 या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयात व्याखान देणार होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्र पाठवून कोळसे पाटील यांना आमंत्रित केलं होतं.

मात्र, कोणतही कारण न देता महाविद्यालय प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्याचा आरोप कोळसे-पाटलांनी केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यी संघटनांकडून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून चालवलं जातं. महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्याचे अधिकार डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आहेत, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नाहीत अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्मावी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त माजी न्यायमूर्ती बी.जे. काेळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमाेल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजन केले हाेते. आज बी.जे.काेळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयाेजित करण्यात आले हाेते.

काेळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार हाेते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या असून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत.