भारताबद्दल ‘फालतू’ची ‘बडबड’ करणार्‍या PAK मंत्र्यानं भाषणात PM मोदीचं नाव घेताच बसला ‘झटका’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर भारताच्या हातून राजनैतिक पराभवाचा सामना करणारा पाकिस्तानला आता सर्वत्र भारत आणि मोदीच दिसत आहे. यानंतर इम्रान यांनी नवे अस्त्र वापरत देशांतर्गत वातावरण तापविण्याचा प्रयत्न चालवला आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर आज पाकिस्तानचे लोक देशभर निदर्शने करीत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी काश्मीरच्या प्रश्नावर आपल्या देशातील लोकांना अर्धा तास उभे राहण्यास सांगितले होते. या भागात रेल्वेमंत्री शेख रशीद हे पाकिस्तानमधील सभेला संबोधित करत भारताविरोधात गर्ल ओकत होते, ते बोलत असताना त्यांना अचानक त्यांच्या माइकमध्ये विजेचा झटका बसला आणि ते अचानक घाबरून गेले. यावर तेथे उभे असलेले लोक हसू लागले, त्यावर मंत्री म्हणाले की मोदी आपला उत्साह कमी करून वातावरण खराब करू शकणार नाहीत.

वास्तविक, शेख रशीद हे पाकिस्तानच्या त्या मंत्र्यांपैकी आहेत जे सतत भारताविरूद्ध वक्तव्य करत असतात. शुक्रवारी दुपारी ते भाषण देत असताना त्यांच्या माईकला करंटचा झटका बसला. जेव्हा ते भारताविरूद्ध वक्तव्य करीत होते तेव्हा हा प्रकार घडला आणि अचानक त्यांना भीती वाटली. यानंतर लोकांना हसू आवरले नाही. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून पाकिस्तानी नागरिकच त्यांच्यावर टीका करत आहेत.

यानंतर सावरून परिस्थिती हाताळताना त्यांनी नंतर सांगितले की असे दिसते की येथे करंट आहे, परंतु हे मोदी या प्रक्रियेस विफल करु शकत नाहीत. शेख रशीद यांनी याआधीही बर्‍याच वेळा भारताविरूद्ध युद्धाची धमकी दिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवणारी व्यक्ती ही व्यक्ती होती.

इम्रान यांची पुन्हा युद्धाची धमकी :
दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशातील लोकांना दर शुक्रवारी १२ ते १२:३० दरम्यान काश्मीरच्या मुद्यावर रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या माध्यमातून संदेश द्यावा असे आवाहन केले आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये इम्रानच्या आवाहनावर लोक बाहेर आले. स्वत: इम्रान खान यांनीही जाहीर सभांना संबोधित केले आणि पुन्हा एकदा भारताविरूद्ध वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही पाकिस्तानी पंतप्रधानांनी युद्धाची धमकी दिली आणि काश्मिरींसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ असे सांगितले. इतकेच नव्हे तर इमरान खान म्हणाले की, काश्मीरवर भारताने हल्ला केला तर असे युद्ध होईल जे संपूर्ण जगाचे नुकसान करेल.

‘काश्मीर अवर’ वर पाकिस्तानी पत्रकारच करताहेत निषेध :
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या ‘काश्मीर अवर’ च्या आवाहनावर तेथील पत्रकारच निषेध करत आहेत. अनेक पत्रकारांनी ट्वीट करून असे लिहिले आहे की काही आंदोलकांमुळे हजारो लोकांचे नुकसान होत आहे, रस्ते जाम झाले आहेत, सरकारने काय साध्य केले ते सांगावे.

आरोग्यविषयक वृत्त –