टीम पेन विराट कोहली वादात ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूची उडी

 वृत्तसंस्था: पर्थ मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.पर्थ कसोटीची  भारताच्या पराभवापेक्षा जास्त चर्चा झाली ती दोन्ही कर्णधारांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे. पराभवानंतर एकमेकांना हस्तांदोलन करताना विराटने टीम पेनला शुभेच्या दिला नाहीत. यामुळे विराटवर अनेकांची टीका केली होती.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत पोहचली असून पर्थ कसोटीत विराट कोहली आणि टीम पेन यांच्या वादात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगनेही उडी घेतलीआहे.  ब्रॅड हॉगने कोहलीच्या वागण्याचं समर्थन केले आहे. विराट हा भारतीय संघाचा उर्जास्त्रोत असून तो जे वागला त्यात काहीच गैर नाही असे ,हॉगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

विराट हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे  एक उत्तम नेतृत्वगुणही आहे. ज्यावेळी विराट मैदानात येतो त्याच्यातला उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यामुळे विराट आपल्या सहकाऱ्याकडूनही अशीच अपेक्षा करतो. विराट फलंदाजी करताना कोणतीही खेळपट्टी अवघड वाटत नाही. तसेच धावफलक हालत ठेवणे, चौकार, षटकाराची नजाकता ह्या गोष्टी विराटला महान बनवतात अशा शब्दात हॉगने टीआयला दिलेल्या मुलाखतीत  विराटाचे कौतुक केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसरा कसोटी सामना हा ‘बॉकसींग डे’ सामना असून बॉकसींग डे’ सामन्यात  भारताचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष  असणार आहे.