शिवकुमार स्वामींना ‘भारतरत्न’ न मिळणं खेदजनक : खर्गे

दिल्ली: वृत्तसंस्था – प्रणव मुखर्जींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले मात्र, नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांना दिलेल्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराबाबद काँग्रेस नाराज असल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवकुमार स्वामी यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे होता, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवकुमार स्वामी यांचे निधन झाले असून. ते 111 वर्षांचे होते. सरकारला शिवकुमार स्वामी यांच्या मोलाच्या कार्याबाबद माहिती असून देखील त्यांनी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला नाही. हे अतिशय खेदजनक आहे’, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.