क्राइम पेट्रोल पाहून केली अल्पवयीन मुलाची हत्या 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहा वर्षांच्या मुलाची हत्या करून या अल्पवयीन मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ती सुटकेस नाल्यात फेकून दिली. हा प्रकार मुंबईतील साकीनाका भागात घडला आहे. दुपारी सडेतीनच्या सुमारास या सगळ्या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आणि त्याची कसून  चौकशी केल्यानंतर आपणच या मुलाचा खून केल्याची कबुली या मुलाने दिली.  तसेच अल्पवयीन मुलाने आपण मृत मुलाच्या वडिलांकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याचीही कबुली दिली.

हा मुलगा सकिनाका भागामध्ये २० डिसेंबरला शिकावणीला गेला असून तो घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलीस तक्रार दिली. त्या नंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून तपास सुरु केला. त्यानंतर या सर्व प्रकारणाचा छडा लागला. आणि नंतर या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मुलाचा खून कसा करण्यात आला ते स्पष्ट होणार आहे असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अल्पवयीन मुलगा याने जेव्हा दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याने एक तास या मुलाच्या वडिलांसोबतही घालवला मुलाच्या वडिलांनाही तुमचा मुलगा शोधण्यास मदत मी करतो असे आश्वासन सुद्धा त्या मुलाने दिले. मुलाची हत्या केल्यानंर ज्या सुटकेस मध्ये त्या मुलाचा मृतदेह भरला होता ती सुटकेस बरोबर घेऊन हा अल्पवयीन आरोपी फिरत होता. नंतर या मृत देहाचे काय करावे असे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले, त्याला काहीच समजले नाही म्हणून शेवटी मृत देह नाल्यात फेकून दिला.

आपण पकडले जाऊ या भीतीने सुरुवातीला हा अल्पवयीन आरोपी खोटं बोलत होता. मात्र चौकशी झाल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि क्राइम पेट्रोल ही सीरियल पाहून आपण हा कट रचल्याचेही त्याने स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक सुनील माने आणि डीसीपी नविनचंद्र रेड्डी यांनी या प्रकरणात लक्ष घालत अल्पवयीन आरोपीला पकडले आणि या हत्येचा छडा लावला.