काँग्रेसची ऑफिशियल वेबसाइट हॅक, हार्दिक पटेलचे अश्लील फोटो प्रदर्शित

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन दिवसही झाले नाहीत तेच गुजरात काँग्रेसची ऑफिशियल वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. 2017 च्या गुजरात निवडणुकीआधी हार्दिक पटेलची कथित सेक्स टेप व्हायरल झाली होती.

त्यातील टेपचा एक स्क्रीनशाॅट गुजरात काँग्रेसच्या वेबासाईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता एका दिवसातच काँग्रेसची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर महत्त्वाचा कंटेट काढून तिथे हार्दिकचा सेक्स टेपमधील फोटो पोस्ट करण्यात  आला. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या नव्या नेत्याचे स्वागत आहे.’ हा प्रकार कळताच काँग्रेसच्या आयटी सेलने ही वेबसाइट तात्काळ बंद केली आहे. इतकेच नाही तर, याप्रकारामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही असं स्पष्टीकरणही काँग्रेसने दिलं आहे.

दरम्यान, याबाबत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले की, “हार्दिक पटेलच्या काँग्रेस प्रवेशाचा ज्यांना त्रास होतो अशा लोकांनीची ही वेबसाइट हॅक केली आहे. वेबसाइटला तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आलं आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वेबसाइट पुन्हा सुरू करण्यात आली आहे.” इतकेच नाही तर, या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले आहे.

याआधी भाजपची वेबसाइट हॅक झाली

काही दिवसांपूर्वी पक्षाची वेबसाइट bjp.org हॅक झाली होती. भाजपच्या वेबसाइटला भेट दिल्यास आम्ही लवकरच परत येऊ असा संदेश दिसत होता. 5 मार्चला सकाळी 11 वाजता हॅक झाली होती. भाजपची साइट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल इनचार्ज दिव्या स्पंदना यांनी खिल्ली उडवली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us