IPL 2020 साठी Off-Tube कॉमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपट्टू डिन जॉन्सचं ह्दहयविकाराच्या झटक्यानं निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपट्टू डिन जॉन्सचं ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्याबाबतचं वृत्त ‘आऊटलूक’नं दिलं आहे. डिन जॉन्स हे स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंटेटर टीमचा एक भाग होते. जॉन्सचं 59 वर्षाचे होते. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2020 मध्ये ते ऑफ-टयूब कॉमेंट्री करत होते.

मेलबोर्न येथे डिन जॉन्स यांचा जन्म झाला होता. त्यांनी कारर्किदीत 52 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. 46.55 च्या सरासरीनं त्यांनी 3631 धावा केल्या असून त्यांचा सर्वोत्तम 216 धावांचा आहे. जॉन्स हे अ‍ॅलन बॉर्डरच्या टीमचे सदस्य होते. त्यांच्या नावावर 11 शतके आहेत. मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like