…म्हणून त्यांनी केले स्मशानभूमीत लग्न

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन  – स्मशान म्हणजे कोणालाही न आवडणारे ठिकाण माणूस साधा स्मशानभूमी जवळून चालला तरी समशानभूमीत ढुंकून बघतहि नाही. परंतु बेळगावच्या स्मशान भूमीत मात्र अजब प्रकार आज घडला आहे. सदाशिवनगरच्या स्मशानभूमीत आज जळत्या प्रेताच्या अग्नीस साक्षी मानून लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या आहेत. घडलेला सर्व प्रकार विचित्र वाटत असला तरी हा प्रकार सत्य प्रकार आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचेच अवचित्य साधून केला विवाह
मानवाने विज्ञानवादी बनण्याचा विचार आंबेडकरांनी नेहमीच आपल्या भाषणातून दिला होता. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचेच अवचित्य साधून हा विवाह आज करण्यात आला. अंधश्रद्धेला आळा बसवण्यासाठी हा विवाह करण्यात आला असून मानव बंधुत्व संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आमदार सतीश जाळकीहोळी यांच्या पुढाकारातून हा विवाह पार पडला आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी हा विवाह करण्याचे दुसरे एक कारण हे कि आंबेडकरांनी जाती निर्मूलनाचा सर्वोत्तम उपाय हा आंतरजातीय विवाह हा सांगितला होता आणि आज पार पडलेला विवाह हा आंतरजातीय विवाह होता.

दलित मुलाचा लिंगायत मुलीशी झाला विवाह 
सोपान बाळकृष्ण जांबोटी या दलित मुलाचा रेखा चंद्रप्पा गुरवणवर  हिच्याशी हा विवाह झाला आहे. विवाह अंतरजातीय असल्याने आणि स्मशानभूमीत केल्याने या विवाहाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त केले जाते आहे.

आमदारांनी केला ५० हजार रुपयांचा आहेर
या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या आमदार सतीश जाळकीहोळी यांनी जोडप्याला ५० हजार रुपयांचा आहेर केला असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला  सरकारने ३ लाखाची मदत करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणारा आहे असे उपस्थितांना सांगितले आहे.

आमदारांनी या अगोदर हि अशा प्रकारचे अनेक अंधश्रद्धा निर्मूलनाचे उपक्रम केले असून मागील महापरिनिर्वाण दिना दिवशी त्यांनी स्मशानभूमीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिथे जीवनाचा शेवट होतो तेथे नवजीवनाची गाठ बांधणाऱ्या जोडप्यावर परिवर्तनवादी लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे.