दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचे छावणीत लग्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे लग्नसोहळे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार धूम सुरू आहे. अशा परीस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे वेगळेच चित्र पहायला मिळाले. कर्जबाजारीपणा व दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न चारा छावणीतच करून खर्चाला फाटा देण्यात आला. आज दुपारी झालेले हे लग्न चांगलेच चर्चेचा विषय ठरले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत ८११ जनावरे आहेत. कै. किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पूजा यांनी लग्नाची रेशीमगाठी बांधली.
नवदाम्पत्यांच्या खरची परिस्थिती हालाखिची आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन हा विवाह मांडवगण जनावरांच्या छावणीत करण्याची संकल्पना मांडली. दोन्ही परिवाराने मान्यता दिली.

श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी भोजनाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गरीब कुटुंबातील वधू वरांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या. यावेळी वधू वरांना सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठलराव वाडगे यांनी शुभेच्छा दिल्या. आज दुपारी झाले हे लग्न श्रीगोंदा तालुक्यात सराव जिल्हाभरात चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.