”हि पोरगी साजूक तुपातली हिला फरहान अख्तर चा लागलाय नाद”…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्यावर्षी अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय. होय, फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.

फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं) हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानच्या मुलांसोबत वेळ घालवतांना दिसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी आपल्या नात्याबद्दल गंभीर आहेत. फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघंही नक्कीच पुढचा विचार करतील.

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता.

का झाला होता फरहान अख्तर चा तलाक ?
फरहान अख्तर आणि अधूना यांच्या वेगळ्या होणाऱ्या चर्चा इंडस्ट्री मध्ये बऱ्याच गाजल्या होत्या, श्रद्धा कपूर हे या दोघांचं वेगळं व्हायचं कारण असू शकतं पण नंतर अश्या चर्चांना उधाण आलं की आदिती हैदरी हे या मगच खरं कारण आहे, फरहान अख्तर आणि आदिती हैदरी मध्ये जवळीकता वाढली होती. त्यामुळे अधुना फरहान पासून वेगळी झाली असं बोलल गेलं.

यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेचं जाहिर केले होते. फरहान तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत.

कोण आहे शिबानी दांडेकर
शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.