उभ्या कंटेनरवर लग्नाच्या वरातीच्या बसची धडक, 4 ठार तर 6 जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर -भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला पहाटे दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील ४ जण गंभीर आहेत.
विठाबाई झिलपे, करुणा खोंडे, आनंद आठवले आणि सतीश जांभुळकर अशी अपघातात मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

हे लग्नाचे वऱ्हाड भंडाराहून नागपूरला परत जात होते. बसमध्ये ३० वऱ्हाडी होती. त्यावेळी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नागपूरजवळील शिंगोरी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. त्याला बसने मागून जोरदार धडक दिली. त्यात चार जण जागीच ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

You might also like