‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे ‘आवाहन’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – खबरदारीची उपाययोजना म्हणून पाथरी, सेलू, सोनपेठ, मानवत नगर परिषदेकडून आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सुचना केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन म्हणून सेलू, मानवत, सोनपेठ, पाथरी नगर परिषदेकडून आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाथरी येथे भरणारा गुरुवार व रविवार रोजीचा बाजार बंद ठेवण्यात येत असल्याचे आवाहन पाथरी नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अद्यापही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
parbhani collector