Weekly Horoscope : ‘या’ राशींची पैसा-व्यापारात होईल प्रगती, जाणून घ्या कसा असेल नवा आठवडा ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऑक्टोबरचा नवा आठवडा सुरू झाला आहे. नवरात्रीमध्ये सुरू झालेला हा आठवडा अनेक राशींसाठी लाभदायक आहे. या आठवड्यात मिथुन, वृश्चिक आणि मकर राशिच्या लोकांना पैसा आणि व्यापारात मोठे यश मिळू शकते. कोणत्या राशींसाठी नवा आठवडा कसा असेल, कोणत्या अडचणी येऊ शकतात, ते जाणून घेवूयात…

मेष
आठवडता उत्तरोत्तर शुभ होत जाईल. नियम आणि संयमाद्वारे यश मिळेल. मध्यापासून संधीचा लाभ घ्या. मनोरंजनात रूची वाढेल. नवीन गोष्टींवर जोर द्याल. धर्म, श्रद्धा याकडे ओढा वाढेल. आरोग्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात काळजी घ्या.

वृषभ
मेहनत आणि सामंजस्य वाढवत आलेला आठवडा लक्ष्याबाबत समर्पणाचे संकेत देतो. महत्वपूर्ण कामे वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचा विचार कराल. सुरूवात प्रभावशाली राहील. आवश्यक कामांना उत्तरार्धात गती देऊ शकता. विरोधक शांत राहतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन
परीक्षा, स्पर्धेसाठी आठवडता सहायक आहे. मेहनत आणि लक्ष यामुळे यश मिळेल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल. सुरूवात साधारण होईल. उत्तरार्ध अधिक चांगला असेल. शुभतेचा संचार कायम राहील. नोकरी, व्यापारात लाभ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क
प्रेम आणि पवित्रता वाढवत आलेला आठवडा सतर्क राहण्याचे संकेत देत आहे. स्पर्धा परीक्षेत यश शक्य. मित्र आणि संततीकडून शुभवार्ता समजतील. महत्वाची कामे लवकर पूर्ण करा. व्यवसायिकतेवर जोर द्या. उधार टाळा. महत्वपूर्ण कामे पूर्वार्धात करा.

सिंह
कुटुंबात सहजता, सामंजस्याने घेण्याचा सल्ला देत आलेला आठवडा उत्तरोत्तर शुभ आहे. धाडस, पराक्रम वाढलेले राहील. रुटीनवर फोकस ठेवा. उत्तरार्धात प्रेम आणि विश्वासाला बळ मिळेल. मित्र सहकार्य करतील. व्यवसायिक प्रकरणात धैर्य ठेवा. व्यवसायिकता कायम ठेवा.

कन्या
शुभ सूचनेच्या शक्यतेसह आलेला आठवडा उत्तम फलदायक आहे. संपर्क चांगला राहील. कौटुंबिक प्रकरणात हस्तक्षेप टाळा. वाहन इत्यादीची प्राप्ती शक्य आहे. मित्र सहकार्य करतील. प्रेमसंबंधात दृढता वाढेल. महत्वाची कामे लवकर पूर्ण करा. धैर्य आणि धर्म कायम ठेवा.

तुळ
उत्सवधर्म वाढवत आलेला आठवडा अपेक्षेनुसार योग्य परिणाम देणारा आहे. मोठ्या कामांसोबत जोडले जाण्याची संधी मिळेल. सामाजिक संपर्क आणि संबंधाची कक्षा मोठी होईल. आपल्या माणसांचे सहकार्य मिळेल. बंधुत्वाला बळ मिळेल. सक्रियता कायम ठेवा. आठवड्यात सतर्क राहून काम करा.

वृश्चिक
सृजनात्मकता आणि सक्रियता वाढवणारा आठवडा श्रेष्ठ फलदायक आहे. उत्सव आयोजनात सहभागी व्हाल. जवळच्यांशी मिसळून राहील्यास शुभदायी असेल. इच्छित प्रस्ताव मिळू शकतात. जीवनस्तर सुधारेल. वाणीमुळे लाभ होईल. प्रतिभा प्रदर्शनाने सर्व प्रभावित होतील. नोकरी, व्यापारात नव्या संधी येतील.

धनु
व्यवसायिक कामात व्यस्तता वाढवत आलेला आठवडा प्रभाव वाढवणारा आहे. सुरूवातीला गुंतवणूक करताना सतर्क राहा. मध्यापासून सृजनात्मकता आणि नवाचारात वाढ होईल. दिखावा टाळा. नात्यात सन्मान द्या. उत्सव आयोजनात सहभागी व्हाल. रक्ताची नाती सुधारतील. भौतिक साधने वाढतील.

मकर
अर्थ आणि व्यापारात शुभ संचार घेऊन आलेला हा आठवडा लाभावर फोकस कायम ठेवणारा आहे. कार्यक्षेत्रात जास्तीतजास्त वेळ द्याल. महत्वाच्या लोकांशी भेट होऊ शकते. मध्यापासून आरोग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आठवड्यात अनुकूलता आणखी वाढेल. स्थिती सुधारेल. आपल्या लोकांना सन्मान द्या.

कुंभ
सर्वांशी सामंजस्य आणि सहकार्य वाढवत आलेला आठवडा विविध क्षेत्रात यश देईल. प्रशासन व्यवस्थापनाच्या सहकार्याने इच्छित यश मिळवू शकता. अनुकूलतेचा टक्का वाढत राहील. संपर्क चांगला राहील. सक्रियता कायम ठेवा. महत्वाची कामे आडवड्याच्या अखेर पूर्ण करण्याचा विचार करा.

मीन
भाग्याची प्रबळता वाढवत आलेला आठवडा श्रेष्ठ फलदायक आहे. विनम्रता आणि विवेकाने पुढे जा. सर्वांचे सहकार्य मिळेल. पात्रता दाखवताना प्रभावी ठराल. जबाबदार्‍या योग्य पद्धतीने पार पाडाल. महत्वाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. भेटीगाठी आणि चर्चा यासाठी वेळ काढा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.