ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जरा ‘सावध’, ‘हे’ दिवस ‘या’ राशींसाठी अशुभ, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व ग्रहांमध्ये चंद्राचे स्थान सर्वश्रेष्ठ मानले जाते. चंद्र जवळपास सवा दोन ते अडीच दिवस एका राशीत असतो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्र जवळपास 4 राशीमध्ये भ्रमण करेल. मात्र सर्व 12 राशींवर याचा प्रभाव दिसून येईल.
मेष रास –
या राशीच्या व्यक्तींचा मान सन्मान वाढेल. काही तरी वेगळे करण्यात यशस्वी व्हाल. 3 ऑक्टोबरला मात्र सावध रहा, आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास –
सुरुवातीपासून थोडा तणाव असेल. व्यवसायात आणि दांपत्य जीवनात यश येईल. परंतू शेवटी अधिक कष्ट करावे लागू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. 5 ऑक्टोबरला सावध रहावे लागेल.

मिथुन रास –
या राशीला शिक्षणात, स्पर्धत यश मिळेल. 7 ऑक्टोबर हा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. सावध रहा.

कर्क रास –
या राशीसाठी आठवडा उत्तम असेल. कुटूंबात कलह असेल. वस्तू खरेदीवर खर्च होईल. 6 ऑक्टोबर हा दिवस तसा तणावात्मक असेल.

सिंह रास –
हा आठवडा चांगला लाभकारक ठरेल. खर्च वाढेल, मान सन्मान वाढेल. पहिला आठवडा तुमच्यासाठी उत्तम असेल. परंतू 7 ऑक्टोबरला काळजी घ्या.

कन्या रास –
आठवड्यात थोडा मानसिक ताण जाणवेल. व्यवसायात फायदा होईल. नव्या संधी मिळतील. 1 ऑक्टोबरला थोडा तणाव असेल.

तुळ रास –
या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल. चैनीच्या वस्तूवर अत्याधिक खर्च होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. 2 ऑक्टोबर हा दिवस तणावपूर्ण असेल.

वृश्चिक रास –
आठवड्यात होणारा खर्च जास्त असेल. धावपळ देखील अधिक होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. मान सन्मान वाढेल. प्रतिष्ठा लाभेल. 4 ऑक्टोबर हा दिवस तणावात्मक असेल.

धनू रास –
या राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा उत्तम असणार आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. देशात प्रवास करण्याचा लाभ मिळेल. अडून राहिलेले धन परत येईल. 7 ऑक्टोबर हा दिवस तणावात्मक असेल.

मकर रास –
मान सन्मान वाढेल. कुटूंबात आनंद असेल. मंगलकार्याचा योग आहे. न्यायालयील प्रकरणात यश मिळेल. 5 ऑक्टोबरला सावध रहा.

कुंभ रास –
या राशीच्या व्यक्तींसाठी दिवस उत्तम असणार आहे. शिक्षणात, स्पर्धेत यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. जबाबदाऱ्या वाढतील. 6 ऑक्टोबर हा दिवस थोडा धावपळीचा आणि खर्चिक असेल.

मीन रास –
आरोग्य चांगले राहील. व्यवसाय करण्यास सुरुवात करणार असाल, वाहन खरेदी करणार असाल तर दिवस उत्तम असेल. 1 ऑक्टोबर हा दिवस आरोग्यासाठी प्रतिकूल असेल.

Visit : policenama.com