साप्ताहिक राशिफळ : 29 जून ते 5 जुलै – आठवड्यात ‘या’ तारेखला जरा सावध रहा

मेष
संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी संमिश्र आहे. सुरुवातीला आरोग्यावर काही विपरीत परिणाम होऊ शकतो. गुप्तशत्रूंपासून बचाव करावा लागेल. आठवड्याच्या मध्यावर मान-सन्मानात वाढ होईल. व्यापार्‍यांसाठी काळ खुपच चांगला आहे. विवाह, किंवा शुभ कार्ये करण्याशी संबंधित चर्चा यशस्वी होईल. सासरच्यांकडून सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी कारस्थानी लोकांपासून सावध राहा. 3 तारीख अशुभ.

वृषभ
आठवड्याची सुरुवात खूप अनुकूल होईल. शिक्षणात यश मिळेल. नवीन जोडप्याला संततीप्राप्तीचे योग आहेत. प्रादुर्भावाची सुद्धा शक्यता आहे. शासन सत्तेचा पूर्णपणे वापर करून आपली कामे पूर्ण केली तर यश नक्की मिळेल. विवाहाशी संबंधित चर्चा यशस्वी होतील. आठवडा व्यापार्‍यांसाठी खुपच चांगला ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्या. 5 तारीख अशुभ.

मिथुन
आठवड्याच्या सुरूवातीस कौटुंबिक कलहामुळे मानसिक त्रास होईल. प्रवास काळजीपूर्वक करा, खिसेकापूपासून सावध राहा. आठवड्याच्या मध्यावर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. घरात मंगलकार्याचा शुभयोग येईल. तुम्ही ठरवलेली रणनीतीही यशस्वी ठरेल. आठवड्याच्या शेवटी व्यापार्‍यांसाठी चांगला काळ, भागीदारी व्यवसाय टाळा. 30 तारीख अशुभ.

कर्क
धैर्य आणि सौम्य स्वभावाच्या बळावर आपण विषम परिस्थिती देखील सामान्य कराल. आपण घेतलेल्या निर्णयाचे व कृतींचे कौतुक होईल. परंतु ज्येष्ठ सदस्य किंवा भावांमध्ये मतभेद होऊ देऊ नका. आई-वडीलांच्या आरोग्याबाबत जागृत राहा. आठवड्याच्या मध्यावर केंद्र किंवा राज्य सरकारशी संबंधित कामे मार्गी लागतील. संतती संबंधित चिंता देखील दूर होईल. 4 तारीख अशुभ.

सिंह
आठवड्याच्या सुरूवातीला देशाटनातून लाभ होईल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. जे लोक तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत होते, तेच आता मदतीसाठी पुढे येतील. आठवड्याच्या मध्यावर, एखादी महागडी वास्तु खरेदी कराल. कुणाकडून जास्त कर्ज घेणे शक्यतो टाळा. आठवड्याच्या शेवटी शुभवार्ता समजल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. 29 तारीख अशुभ.

कन्या
आठवड्याच्या सुरूवातीस रोजगाराशी संबंधित प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत जबाबदार्‍या वाढतील. नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर अनुकूल वेळ आहे. परदेशात प्रवास करायचा असेल किंवा परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज करायचा असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही धर्मकार्यात जास्त सहभागी व्हाल, ज्यामुळे सामाजिक प्रभाव वाढेल. संततीची चिंता दूर होईल. प्राप्ति आणि प्रादुर्भावाचाही योग आहे. 5 तारीख अशुभ.

तुला
आठवड्याच्या सुरुवातीला जास्त धावपळ केल्यामुळे थकवा जाणवेल. एखादा नातेवाईक किंवा मित्राकडून वाईट बातमी देखील मिळू शकते. जास्त खर्च टाळा, अन्यथा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यावर मानसन्मान वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. घरात मंगलकार्याचा शुभ प्रसंग येईल. घर किंवा वाहन खरेदी कराल. 2 तारीख अशुभ.

वृश्चिक
आठवड्याच्या सुरूवातीला उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बरेच दिवसांपासून दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात योजना यशस्वी होतील. परंतु ज्येष्ठ सदस्यांमध्ये किंवा मोठ्या भावांमध्ये मतभेद होऊ देऊ नका. आठवड्याच्या मध्यावर, प्रवासातून फायदा मिळेल. परदेशी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केल्यास यश मिळेल. शिक्षण स्पर्धेत यश मिळेल. नवीन जोडप्यांना संततीप्राप्तीचा योग आहे. प्रादुर्भावाची शक्यता आहे. 1 तारीख अशुभ.

धनु
आठवड्याच्या सुरुवातीला काम, व्यवसायात वाढ होईल. तसेच सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुठल्याही प्रकारचे नवीन काम सुरू करायचे असेल किंवा करारावर सही करायची असेल, तर वेळ अनुकूल आहे. कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील मंगलकार्याच्या शुभ प्रसंगाने मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या अखेरीस प्रवासाचा योग आहे. योजना गोपनीय ठेवून काम केल्यास पूर्णपणे यशस्वी व्हाल. 3 तारीख अशुभ.

मकर
संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी उत्तम यशदायक आहे. निवडणुकांशी संबंधित कोणते काम करायचे असेल तर त्यातही यशस्वी व्हाल. आपण कोणत्याही प्रकारचे सर्वात मोठे कार्य किंवा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास निर्णय घ्या, परिस्थिती तुमच्या बाजूने आहे, संधीचा फायदा घ्या. परदेशी कंपनीत अर्ज करणे किंवा परदेशी नागरिकत्वासाठी व्हिसासाठी अर्ज केल्यास यश मिळेल. 4 तारीख अशुभ.

कुंभ
आठवड्याच्या सुरूवातीस मानसिक त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्या, कार्यक्षेत्रात कटकारस्थानांना बळी पडू नका. अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. असे असले तरी यशाच्या बाबतीत संपूर्ण आठवडा उत्तम आहे. नवीन कार्य योजनाही यशस्वी होतील. सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभाग घ्याल. प्रतिष्ठा वाढेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या आस्थापनांशी संबंधित कामात यश येईल. 29 तारखेला जरा सावध राहा.

मीन
आठवड्याच्या सुरूवातीस कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. विवाहासंबंधी चर्चा यशस्वी होतील. सासरच्या बाजूकडून सहकार्य मिळेल. व्यापारासाठी काळ खूप अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यावर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. कामात कटकारस्थानापासून बचाव करा. महागड्या वस्तू खरेदी कराल. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचा योग आहे. धर्माच्या बाबतीत दानधर्म कराल. कामात, व्यवसायात प्रगती होत राहील. 1 तारखेला सावध राहा.