Weekly Salary In India | आश्चर्यम ! आता भारतात ‘ही’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना दर आठवड्याला देईल सॅलरी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weekly Salary In India | भारतात पहिल्यांदाच एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना साप्ताहिक पगार (Weekly Salary In India) देणार आहे. होय ! तुम्ही हे भारताबाहेर ऐकले असेलच पण आता इथेही ते सुरू झाले आहे. कारण, B2B ई-कॉमर्स कंपनी इंडिया मार्ट (B2B E-Commerce Company India Mart) ने आपल्या कर्मचार्‍यांना दर आठवड्याला पगार (Weekly Payment) देण्याची घोषणा केली आहे. (Weekly Payout Of Salaries)

 

कंपनीने साप्ताहिक वेतन धोरण (Weekly Pay Policy) जाहीर केले आहे. म्हणजेच आता कर्मचार्‍यांना पगार मिळण्यासाठी महिनाअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.

 

कंपनीने एफबी पोस्टमध्ये दिली माहिती
इंडिया मार्ट (India Mart) चे म्हणणे आहे की, यामुळे कर्मचार्‍यांवरील आर्थिक भार कमी होईल आणि ते अधिक चांगले काम करतील. इंडियामार्टने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, फ्लेक्सिबल वर्क कल्चर निर्माण करणे आणि कर्मचार्‍यांचे आर्थिक हित साधण्यासाठी, इंडियामार्ट ही साप्ताहिक वेतन देण्याची पद्धत स्वीकारणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. (Weekly Salary In India)

परदेशात हा नियम अगोदरपासून
कंपनीच्या वक्तव्यानुसार, साप्ताहिक वेतन हे कर्मचारी कल्याणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि यूएसमध्ये अगोदरपासूनच साप्ताहिक पगार देण्याची पद्धत सामान्य आहे. विकली पेरोलमुळे कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही फायदा होईल. इंडियामार्टने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 12.4 टक्के घटसह तो 70.2 कोटी रुपयांची घसरण नोंदवली आहे.

 

गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीने 80.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
एका रेग्युलेटर फायलिंगमध्ये म्हटले आहे
की,आर्थिक वर्ष 22 च्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा महसूल 8.3 टक्क्यांनी वाढून रू. 188.1 कोटी झाला,
जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रू. 173.6 कोटी होता.

 

Web Title :-  Weekly Salary In India | indiamart claims to be first in india to move to weekly payout of salaries know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thergaon Queen | पोलीस ठाण्यातून बाहेर येताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा, व्हिडीओ व्हायरल

 

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus