Vaccination registration | मुंबईसह काही जिल्ह्यात लवकरच साप्ताहिक लसीकरण नोंदणी, ठाकरे सरकारची न्यायालयात ग्वाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी लवकरच साप्ताहिक लसीकरण नोंदणी योजना (Weekly vaccination registration) प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने (Thackeray government) गुरुवारी (दि. 16) उच्च न्यायालयात (High Court) दिली. कोविन अ‍ॅपवरून (Covin app) लसीकरणासाठी नोंदणी (Vaccination registration) करणे अडचणींचे ठरत असल्याचा दावा करत मुंबईकरांसाठी नवी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. यावर न्यायमूर्ती एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी राज्य सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून त्यात ही योजना प्रसिध्द केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लसीकरण नोंदणी (Vaccination registration) सुरू करण्यासाठी पूर्वनिर्धारित वेळ देण्याची याचिकाकर्त्याची सूचनाही सरकारने मान्य केली आहे. तसेच लशींचा तुटवडा असल्याने ही योजना सगळ्या जिल्ह्यांसाठी लागू करणे सध्या शक्य नसल्याचेही सरकारने म्हटले आहे. weekly vaccination registration soon

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

राज्यात सध्या कोल्हापूर, नंदुरबार आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये महिना किंवा साप्ताहिक लसीकरण नोंदणी योजना (Weekly vaccination registration) राबवली जात आहे.
मुंबईत मात्र प्रत्येक दिवसासाठी ही योजना सुरु आहे. त्यात नोंदणीची वेळही निश्चित नाही.
त्यामुळे लसीकरण नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचे याचिकेत म्हटले होते.
राज्य सरकारने आठवडा वा महिन्यासाठीचा लससाठा उपलब्ध करून दिला तर कोविन अ‍ॅपवरून तेवढ्या दिवसांसाठीची लसीकरण नोंदणी योजना आखणे शक्य होईल.
अशी भूमिका पालिकेने घेतली होती. कोविनद्वारे नोंदणीत अडचणी असल्याची बाबही सरकारने मान्य केली आहे.
तसेच त्यातील अडचणी दूर करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांपैकी काही राबवण्याची तयारीही दाखवली आहे.
मात्र लशींच्या पुरवठ्यावर ही योजना राबवणे अवलंबून असल्याचे सरकारने प्रामुख्याने स्पष्ट केले आहे.

Web Title :- weekly vaccination registration soon

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

जर तुमच्याकडे असेल 1994 चे हे नाणे तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल?

SIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे?