गर्भधारणेत अडथळा येण्याचे ‘हे’ आहे एक प्रमुख कारण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वजन जास्त असल्याने किंवा वजन कमी असल्यानेही गर्भधारणेत अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. गर्भधारणेच्या कालावधीत वजनाला खूप महत्त्व आहे. कमी वजन असलेल्या महिलांमध्ये ‘प्रीटर्म बर्थ’चा धोका जास्त असतो. मुलांचे वजन सर्वसामान्यापेक्षा अधिक कमी असते. ज्यामुळे मुलांनाही अनेक समस्या येऊ शकतात. यात अॅनिमिया यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

२२ ते ३४ या वयात महिलांनी गर्भधारणेला प्राथमिकता द्यावी. कारण या कालावधीत गर्भधारणा उत्तम समजली जाते. १८ ते २५ या वयात आपल्या आरोग्य निर्देशांकाकडे लक्ष ठेवून असावे. निर्देशांक अधिक कमी अथवा जास्त झाल्यास त्याचेही परिणाम दिसून येतात. नियमित व्यायाम केला पाहिजे, सकस आहार घ्यावा, वेळेवर जेवण करावे, वजन अधिक असेल तर दही, तूप, लोणी, साखर यासारखे स्निग्ध पदार्थ वर्ज्य करावेत. फळे व हिरवा भाजीपाला खाव्यात.

कमी वजनामुळे वंध्यत्वाचा धोका असतो. कमी वजनाचा अर्थ आहे की शरीरात कमी प्रमाणात फॅटचे प्रमाणे असणे. ओव्यूलेशन आणि मासिक पाळी होण्यासाठी शरीरात फॅट २२ टक्के असावे. शरीरात फॅट कमी असतील आणि मासिकपाळी नियमित होत असूनही गर्भधारणा होईलच याची हमी नसते. शरीराचे वजन वाढल्याने हार्मोन्स वाढतात. यात ओव्यूलेशनवर परिणाम होऊन गर्भधारणेची शक्यता कमी होते. वजन वाढल्यास गर्भपाताचाही धोका असतो. तसेच आईवीएफ उपचारात अडचणी येऊ शकतात.