Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या काही लोक वाढत्या वजनाने (Weight Gain) त्रस्त आहेत, तर दुसरीकडे काही लोक असेही आहेत जे बारीकपणामुळे त्रस्त आहेत. काही लोकांचे भरपूर खाऊनही वजन वाढू शकत नाही (Weight Gain). त्यामुळे अनेकदा त्याची खिल्ली उडवली जाते.

 

शरीराने बारीक असल्याने लोकांचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होऊ लागतो. अशा वेळी, जर तुम्हाला बारीकपणापासून मुक्ती मिळवायची (Weight Gain) असेल, तर तुम्ही या योगासनांचा (Yoga) तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये (Workout Routine) समावेश करू शकता.

 

1. भुजंगासन (Bhujangasana) :
भुजंगासन वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे तुमचे मेटाबॉलिज्म (Metabolism) ठीक करण्यास मदत करते. यासोबतच पचनक्रिया (Digestion) सुधारते. भुजंगासनाचा नियमित सराव केल्यास भूक न लागण्याच्या समस्येपासून (Loss Of Appetite) मुक्ती मिळते. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि पाय सरळ करा.

 

आपले तळवे खांद्याच्या रेषेत आणा. आता श्वासावर नियंत्रण ठेवून शरीराला छातीपासून नाभीपर्यंत वर करा. काही काळ या अवस्थेत राहा. हे आसन नियमित केल्याने तुम्ही दुबळेपणा दूर करू शकता.

 

2. वज्रासन (Vajrasana) :
हे आसन जेवल्यानंतर करतात, कारण हे आसन तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
यासोबतच ते तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म ठीक करते. या आसनामुळे तुमचे मन शांत होते. वज्रासन करण्यासाठी पाय वाकवून त्यावर बसा.

 

या दरम्यान नितंब टाचांच्या मध्ये असावे. यानंतर हात गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ करा.
आपले डोळे बंद करा आणि श्वास आत आणि बाहेर काढण्याची प्रक्रिया करा. या दरम्यान मन पूर्णपणे शांत ठेवा.
हे आसन तुमचे वजन वाढवण्यास मदत करू शकते.

3. पवनमुक्तासन (Pavanamuktasana) :
हे आसन कमी वजनाच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. हे पचनसंस्थेला नियंत्रित करते.
तसेच, हे आसन पोषकतत्व शोषण्यास देखील मदत करते. हे आसन करण्यासाठी पाठीवर जमिनीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराला लागून ठेवा.
दीर्घ श्वास घेऊन उजवा पाय वाकवा.

 

आता दोन्ही हातांनी गुडघे धरा आणि छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडताना डोके उचलण्याचा प्रयत्न करा.
या दरम्यान गुडघ्याने नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या अवस्थेत रहा. नंतर श्वास सोडत प्रक्रिया पूर्ण करा.
वजन वाढवण्यासाठी (Weight Gain) हे आसन फायदेशीर ठरू शकते.

 

4. सूर्यनमस्कार (Surya Namaskar) :
सूर्यनमस्कार केल्याने तुमचे वजन वाढू शकते. यासाठी सूर्यनमस्काराचे 25 ते 30 सेट रोज सकाळी करावेत. यामुळे तुमचे वजन 10 ते 12 किलोने वाढू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Gain | these yoga asana can help you to gain weight know how to do it weight gain tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

 

Karishma Tanna Bold Photo | लग्नानंतर अधिकच बोल्ड झाली अभिनेत्री करिश्मा तन्ना, पारदर्शक गाऊन घालून दिल्या बोल्ड पोज

 

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी