Weight Gain | लाख प्रयत्नानंतर सुद्धा वाढत नसेल वजन तर असू शकते ‘झिंक’ची कमतरता, ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Gain | शरीरात अशक्तपणा (Weakness) जाणवणे, तसेच वजन न वाढणे, हे झिंकच्या कमतरतेचे (Zinc Deficiency) लक्षण असू शकते. शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार (Healthy Diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins), कॅल्शियम (Calcium), प्रोटीन (Protein) आणि झिंक (Zinc) यांसारख्या पोषक घटकांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. हे सर्व पोषक घटक (Nutrients) शरीर निरोगी ठेवण्याबरोबरच (Weight Gain) मानसिक आरोग्य (Mental Health) सुद्धा राखतात.

 

झिंक हे शरीरासाठी एक आवश्यक मिनरल (Mineral) आहे, ज्याच्या कमतरतेमुळे वजन कमी होते, तसेच आरोग्यामध्ये कमजोरी येते. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, शरीरातील 300 पेक्षा जास्त एन्झाईम्सच्या (Enzymes) कार्यासाठी झिंकची गरज असते. झिंक इम्युनिटी (Immunity) मजबूत करते, तसेच अनेक रोगांवर उपचार करते.

 

झिंकच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Zinc Deficiency)

शरीरात अशक्तपणा जाणवतो (Body Feels Weak)

वजन कमी होऊ लागते (Weight Loss).

भूक मंदावते (Decreases Appetite).

व्यक्तीला तणाव जाणवतो (Feels Stressed).

केस गळण्याच्या समस्या होते (Hair Fall Problems).

 

शरीराला आवश्यक झिंकची गरज आहारातून भरून काढता येते. शरीरासाठी आवश्यक झिंकची कमतरता भरून काढणार्‍या 5 पदार्थांबाबत जाणून घेवूयात…

1. मांसासह झिंकची कमतरता पूर्ण करा (Complete Zinc Deficiency With Meat) :
झिंकच्या कमतरतेमुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो. मांसाच्या सेवनाने झिंकची कमतरता भरून काढता येते. शंभर ग्रॅम मांसामध्ये 4.8 मिलीग्राम झिंक आणि इतर जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. जर तुमचे वजन (Weight Gain) वाढत नसेल तर तुमच्या आहारात मांसाचा समावेश करा.

 

2. मशरूमचे सेवन करा (Eat Mushroom) :
शरीरातील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी मशरूम खूप प्रभावी ठरते. मशरूममध्ये कॅल्शियम, पोटॅशियम (Potassium), फॉस्फरस (Phosphorus) आणि प्रोटीन देखील असतात जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

 

3. तिळाचे सेवन करा (Eat Sesame) :
शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तीळ हे सर्वोत्तम आणि औषधी अन्न आहे. तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉलिक अ‍ॅसिड (Folic Acid) आणि बी कॉम्प्लेक्स (B Complex) असतात जे शरीर निरोगी ठेवतात.

 

4. आहारात अंड्याचा समावेश करा (Include Eggs In Diet) :
झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंड्याचे (Eggs) सेवन खूप प्रभावी आहे. तुम्ही अंडी उकडून किंवा ऑम्लेट बनवून खाऊ शकता.
अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये असलेले झिंक शरीर निरोगी ठेवते आणि शरीरातील कमजोरी दूर करते.

 

5. काजूचे सेवन करा (Eat Cashew) :
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी काजूचा आहारात समावेश करू शकता. काजू हे एक असे ड्रायफ्रूट (Dried Fruit) आहे
ज्यामध्ये कॉपर (Copper), व्हिटॅमिन के (Vitamin K), व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि फोलेट (Folate) असते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Gain | you can add these 5 foods in your diet to improve zink deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

 

MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

 

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक