Weight Loss | ‘या’ 5 ड्राय फ्रूट्सचा करा डाएटमध्ये समावेश, वेगाने वजन होईल नियंत्रित; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वाढते वजन (Weight Gain) ही सर्वात मोठी समस्या आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक आहारावर नियंत्रण ठेवतात, जिममध्ये तासनतास वर्कआउट करतात, इतके उपाशी सुद्धा राहतात, परंतु त्यांना मनासारखे शरीर मिळत नाही. वाढत्या वजनामुळे हृदयविकार, टाईप-2 मधुमेह, किडनी आणि लिव्हरच्या समस्या (Heart Disease, Type-2 Diabetes, Kidney and Liver Problem) असे अनेक आजार वाढू शकतात. वजन कमी (Weight Loss) करण्यात तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आहारातील फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन जलद वजन वाढण्यास जबाबदार आहे.

 

आहारातील लो कॅलरी (Calories), पोषकतत्त्वे (Nutrients) असलेले पदार्थ वजन झपाट्याने कमी करतात तसेच शरीर निरोगी ठेवतात. जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर त्यासाठी उपाशी राहू नका, तर अशा काही ड्रायफ्रुट्सचा (Dry Fruits) आहारात समावेश करा जे वजन झपाट्याने कमी (Weight Loss) करण्यात प्रभावी आहेत.

 

जर तुम्हाला जेवणापेक्षा जास्त स्नॅक्स (Snacks) खाण्याची आवड असेल तर अशा पाच कुरकुरीत ड्रायफ्रुट्सचा स्नॅक्समध्ये समावेश करा जे मेटाबॉलिज्म वाढवतात आणि वजनही नियंत्रित करतात. वजन नियंत्रित करण्यासाठी स्नॅक्समध्ये कोणत्या पाच ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा ते जाणून घेवूयात (Five Dry Fruits To Control Weight)…

 

1. बदाम (Almonds) :
स्नॅक म्हणून पोषकतत्वांनी युक्त बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराला कमी कॅलरीज मिळतात. दररोज मूठभर बदाम खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. बदामामध्ये प्रोटीन, मोनोसॅच्युरेटेड फॅट (Monounsaturated Fat) आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर असते जे आरोग्य चांगले ठेवते. बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणाही कमी होतो.

2. काजू (Cashew) :
काजूमध्ये मॅग्नेशियम (Magnesium) असते जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी (Effective For Weight Loss) आहे. मॅग्नेशियम शरीरातील चरबी नियंत्रित करण्यास मदत करते. एनसीबीआयच्या (NCBI) क्लिनिकल ट्रायलमध्ये असे समोर आले आहे की, प्रोटीनने युक्त काजूचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते.

 

3. अक्रोड (Walnuts) :
अक्रोडमध्ये प्रोटीन, मिनरल (Mineral) आणि व्हिटॅमिन (Vitamins) भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते, तसेच वजन नियंत्रित राहते.
हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. अक्रोडाचे सेवन केल्याने मेंदू तीक्ष्ण (Brain Sharp) राहतो.

 

4. शेंगदाणे (Peanuts) :
शेंगदाणे खाल्ल्याने कॅलरीज जलद बर्न (Calories Burn) होतात, तसेच वजन नियंत्रित राहते.
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Monounsaturated Fatty Acid) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Polyunsaturated Fatty Acid) असते,
ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, तसेच वजनही कमी होते.

 

5. खजूर (Dates) :
वजन कमी करण्यासाठी लोहयुक्त खजुराचे सेवन खूप प्रभावी आहे. खजूरमध्ये भरपूर फायबर आणि फॅटी अ‍ॅसिड असते
जे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते (Help to Reduce Body Fat). दररोज 4-5 खजूर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | 5 best and healthy dry fruits that can control weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pragya Jaiswal Bralette Photo | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या साऱ्या हद्दपार, ब्रालेट घालून फोटो केले शेअर..

 

Pune Crime | PhonePe द्वारे पैसे दिल्याचे भासवून 9 सराफांना गंडा ! पुणे पोलिसांकडून एकाला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

8 Don 75 (८ दोन ७५) Marathi Movie | ‘उदाहरणार्थ निर्मित’ या निर्मिती संस्थेच्या ‘8 दोन 75 चित्रपटाला’ 50 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार