Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि जीरे मिसळून बनवा डिटॉक्स वॉटर, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Ayurvedic Drink | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी काही ड्रिंक्स (Weight Loss Drinks) अतिशय प्रभावी मानली जातात. विशेषत: जेव्हा तुम्ही ही पेये सकाळी रिकाम्या पोटी पिता. त्यापैकी सर्वात सामान्य डिटॉक्स ड्रिंक म्हणजे बडीशेप आणि जिरे (Fennel And Cumin Drink). जर तुम्हाला पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासोबतच वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही बडीशेप, जिरे आणि धणे मिसळून डिटॉक्स वॉटर बनवू शकता (Weight Loss Ayurvedic Drink).

 

कसे बनवायचे वेटलॉस डिटॉक्स वॉटर (How To Make Detox Water To Reduce Extra Fat)
हे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी एका मोठा ग्लास पाणी भरून घ्या, यामध्ये एक चमचा धणे, जिरे आणि बडीशेप भिजवा. रात्रभर पाणी असेच राहू द्या आणि नंतर ते उकळून, गाळून घ्या आणि थंड झाल्यावर प्या. त्याचे पोषण वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस देखील टाकू शकता (Weight Loss Ayurvedic Drink).

 

1. जिर्‍याचे फायदे (Benefits Of Cumin)
जिरे तुमच्या मेटाबॉलिज्मसाठी खूप चांगले आहे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. उन्हाळ्यात जिरे खूप फायदेशीर आहे कारण त्यात पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक असतात. याशिवाय, हे आयर्नचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत होते. हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि संक्रमणास कारणीभूत असलेल्या जीवाणूंविरूद्ध लढा देते.

2. धण्याचे फायदे (Benefits Of Coriander)
धणे वजन कमी करण्यासाठी खूप गुणकारी आहे. अँटीसेप्टिक गुणधर्माने समृद्ध धणे, शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकते. इतकेच नाही तर ज्यांना ग्लोईंग स्किन हवी आहे त्यांच्यासाठीही धणे खूप फायदेशीर आहेत. धणे ब्लड शुगर नियंत्रित करतात. हे तुमचे हृदय आणि मन दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे.

 

3. बडीशेपचे फायदे (Benefits Of Fennel)
बडीशेपचा थंड प्रभाव असतो, त्यामुळे जर तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेची अ‍ॅलर्जी असेल तर तुम्ही आहारात बडीशेप समाविष्ट करू शकता.
हे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते. यामुळे पचनक्रियाही मजबूत होते.
बडीशेप रक्त शुद्ध करण्यासाठी देखील खूप चांगली आहे. अ‍ॅसिडिटी दूर करण्यासोबतच बडीशेप कॅन्सरचा धोकाही कमी करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Ayurvedic Drink | weight loss ayurvedic drink how to make detox water to reduce extra fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका करताहेत लोक, जाणून घ्या शरीरासाठी किती घातक

 

Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी व ते आकर्षित दिसण्यासाठी करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय; जाणून घ्या

 

Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास बेल ज्यूस, होतील आश्चर्यकारक फायदे