Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी फायबर महत्वाची भूमिका पार पाडते. काळ्या चण्यात फायबर जास्त प्रमाणात असते. सोबतच यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असते. चण्यात फायबर असल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे खुप वेळ भूक जाणवत नाही. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. वजन नियंत्रणात राहते. शिवाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

काळे चने सेवन करण्याचे फायदे

1 हृदयासाठी लाभदायक
यातील अँटी ऑक्सीडेंट्स आणि फायटो हेल्दी ब्लड व्हेसल्स मेंटन करण्याचे काम करते. तणाव कमी करते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. यातील फोलेट आणि मेग्नेशियममुळे आर्टरीज आकुंचन होण्याची शक्यता कमी होते. यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.

2 भरपूर आयर्न
काळ्या चण्यात भरपूर आयर्न असल्याने शरीरात अ‍ॅनिमियाची समस्या होत नाही, एनर्जी मिळते.

3 प्रोटीन
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त आहे.