Weight Loss Control | वाढत्या वजनावर ‘या’ 7 उपायांनी ठेवा नियंत्रण, अन्यथा तुमची होऊ शकते किडनी निकामी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Control | लठ्ठपणा हा सध्या जगातील एक सामान्य आजार आहे. लठ्ठपणा किंवा पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी लोक विविध उपाय करतात. काही लोक डायटिंग करतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. शरीराचे वजन जसजसे वाढते तसतसा किडनीवरही दबाव वाढतो. किडनी शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. (Weight Loss Control)

 

जेव्हा तुमचे वजन वाढते, तेव्हा किडनीला विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे तिचे बरेच नुकसान होते. वाढत्या वजनामुळे लोक चिंतेत असतात, वाढत्या वजनामुळे शरीरात आजारही वाढू लागतात. लठ्ठपणामुळे थेट किडनीचे नुकसान होतेच, शिवाय इतर अनेक आजारही किडनीशी संबंधित समस्यांना जन्म देतात. (Weight Loss Control)

 

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लठ्ठपणामुळे शरीरातील अनेक आजार जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. या कारणांमुळे किडनीवरही खूप वाईट परिणाम होतो. यासाठी वजन कसे कमी करता येईल ते जाणून घेवूयात…

असे कमी करा वजन
1. बाबा रामदेव सांगतात की मेदोहर वटीच्या 2-2 गोळ्या आणि त्रिफळा गुग्गुळच्या 1-एक गोळ्या नियमित घेतल्यानेही लठ्ठपणा कमी होतो.

2. नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी 30 मिनिटे कपालभातीचा सराव करावा. यामुळेशरीरातील स्नायू सुरळीत होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

3. लो-कार्ब आहाराचे पालन करा. ताटातून कार्बोहायड्रेट पदार्थ काढून टाका.

4. नियमित धावण्याचा सराव करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, चरबी बर्न होते.

 

लठ्ठपणापासून किडनीचे असे करा रक्षण

आहारावर, शारीरिक हालचालींवर आणि पुरेशा झोपेवर अधिक लक्ष केंद्रित करा.
लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी कमी आहार घ्यावा.
शुगर प्रॉडक्टऐवजी साधे पाणी वापरावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Control | weight loss gain marathi weight loss control the increasing weight otherwise your kidney may fail you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Government | दिवाळी संपताच शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा करणार मोठे प्रशासकीय फेरबदल

Sanjay Aggarwal | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेचे मोठे वक्तव्य, म्हणाली – ‘बॉलिवूडमध्ये महिलांना…’