वेट लॉस साठी बेसन पीठाचा वापर उत्तम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डाएट करताना स्वादीष्ट पदार्थांपासून दूर पळण्याची अजिबात गरज नाही. बेसनामध्ये ३८ टक्के प्रोटीन आणि २० टक्के कार्ब असतात. यामुळे डाएटमध्ये बेसनाचा समावेश करू न वजन कमी करता येऊ शकते. वाढत्या वजनाला कंटाळून अनेक जण चविष्ट पदार्थ खाणे टाळतात. असे असंख्य चविष्ट पदार्थ आहेत जे बेसनापासून बनविले जातात. त्यामुळे डाएट करतानाही तुम्ही बेसनापासून बनविलेले चविष्ट पदार्थ खाऊ शकता.

बेसन चण्याच्या डाळीपासून तयार होते. बेसनाचा वापर करून वजन कमी करायचे असल्यास बेसनाचा पोळा, कढी, भजी, खांडवी किंवा पॅनकेकचा डाएटमध्ये समावेश करता येईल. त्वचेसाठीही बेसन खुपच उपयुक्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएटमध्ये बेसनाचा कोणत्याही पदार्थाचा समावेश करता येईल. बेसनपीठामध्ये व्हिटॅमिन-बी १, बी २ आणि बी ९ मुबलक असते. या पदार्थांच्या सेवनाने शरीराचे वजन वेगाने कमी होते.

बेसनामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. वेजिटेरियन व्यक्तींसाठी बेसन हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. १०० ग्रॅम बेसनामध्ये २० ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे गव्हाच्या पिठाऐवजी बेसनाच्या पिठाचा वापर करता येईल. बेसनाचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते आणि डायबिटीजचाही धोका नसतो. बेसनात फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने ते डायबिटीजच्या लोकांसाठीही उत्तम डाएट आहे. शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास बेसन रक्ताची कमतरता दूर करून थकवा दूर करते. बेसनामधील थायमीनमुळे शरीराला एनर्जी मिळते. परंतु, अशाप्रकारचे डाएट करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Loading...
You might also like