Diet Plans for Men : ‘हे’ 7 वेट लॉस डाएट प्लॅन पुरुषांसाठी बेस्ट, सहज कमी होते वजन

नवी दिल्ली : निरोगी शरीरासाठी योग्य वजन आवश्यक असते. कारण, लठ्ठपणामुळे डायबिटीज, हृदय आणि लिव्हरशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये लठ्ठपणामुळे होणार्‍या आजारांचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांसाठी काही विशेष पोषकतत्व आवश्यक असतात आणि त्यांच्यासाठी वजन कमी करणे सोपे नसते. यासाठी 7 असे हेल्दी डाएट जाणून घेवूयात जे पुरुषांसाठी चांगले मानले जातात.

1 हाय प्रोटीन डाएट –
प्रोटीनची जास्त मात्रा निरोगी पद्धतीने वजन कमी करते. जेवणात जास्तीत जास्त प्रोटीनचा सहभाग केल्याने भूक कमी लागते. आणि वजन नियंत्रणात राहते. मांसपेशी मजबूत होतात. कॅलरी बर्न झाल्यानंतरही शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते.

2 मेडिटेरेनियन डाएट –
मेडिटेरेनियन डाएटमध्ये भरपूर भाज्या, फळे आणि मासे यांचा समावेश केला जातो. यामुळे वजन नियंत्रित राहते. गंभीर आजारांपासून बचाव होतो. डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयाचे आजार दूर राहतात.

3 कडधान्य, प्लँट बेस्ड डाएट –
या डाएटमध्ये भाज्या, फळे, दही आणि बीन्ससह काही प्रमाणात अंडे, चीज आणि चिकनचा समावेश केला जातो. हा डाएट फायबर आणि पोषकतत्वयुक्त असतो.

4 लो कार्ब डाएट –
या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त असते. यामुळे पुरूषांचे वजन कमी होते, आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल कमी होतात. ब्लड शुगर नियंत्रित राहते.

5 हाय फायबर डाएट –
हाय फायबर डाएट वजन घटवते. शेवटी आतड्यांमधील जमा फॅटपासून सुद्धा सुटका होते. अनेक गंभीर आजार दूर होतात.

6 पॅलियो डाएट –
पॅलियो डाएट वेगाने वजन कमी करते. आतून शरीर मजबूत होते. या डाएटमध्ये धान्य, शेंगा, रिफाईंड शुगर, सोडा आणि काही डेअरी प्रोडक्ट्स सेवन करण्यास सक्त मनाई असते. तर, जास्तीत जास्त, कडधान्य, हेल्दी फॅट्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश असतो.

7 व्हेजिटेरियन डाएट –
प्लँट बेस्ड फूडयुक्त या डाएटमध्ये भरपूर भाज्या, फळे, शेंगा आणि कडधान्यांचा समावेश असतो. स्टडीजनुसार, निरोगी शरीर आणि योग्य वजन नियंत्रित करण्यासाठी हे डाएट उपयोगी आहे. या डाएटमध्ये गोड ड्रिंक्स आणि खाण्याच्या गोड वस्तूंचा कमी समावेश केला जातो. या डाएटमुळे शरीरात कॅलरी खुप कमी जातात आणि वजन सहज कमी होते.