Weight Loss | काजू खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | हिवाळ्यात (Winter) ड्रायफ्रुट्स (Dry Fruits) खाण्याची एक वेगळीच मजा असते. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हिवाळ्यात शरीर उबदार राहते आणि भूकही कमी लागते. ड्रायफ्रुट्समध्ये काजू (Cashew) हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे, जे निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. काजू बहुतेक भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये त्यांची चव वाढवण्यासाठी वापरतात. काजूचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, तसेच शरीर मजबूत राहते. (Weight Loss)

 

काही लोकांचा असा विश्वास आहे की काजू खाल्ल्याने वजन वाढते, परंतु हे खरे नाही. काजू वजन वाढवत नाही, उलट वजन नियंत्रित करते. काजूमध्ये गुड फॅट (Fats) असते जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. काजूमध्ये असलेले फॅट चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास जबाबदार असते. काजू शरीराला ऊर्जा देते आणि दीर्घकाळ भूक शांत ठेवते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज 3-4 काजूचे सेवन करा. काजू खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात. (Weight Loss)

1. हृदय निरोगी ठेवते (Cashew Keeps The Heart Healthy)
काजू हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, काजूमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅट असते जे हृदय निरोगी ठेवते.

 

2. बद्धकोष्ठतेवर उपचार (Treatment For Constipation:)
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी काजूचे सेवन करावे. काजू बद्धकोष्ठतेवर उपचार करतो. त्यात फायबर असते, त्यामुळे ते मल मोकळे करते, तसेच पचन सुधारते.

 

3. स्मरणशक्ती वाढवते (Increases Memory)
काजूचे सेवन केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. काजूमध्ये मॅग्नेशियम असते जे मानसिक आरोग्य चांगले ठेवते.

 

4. हाडे मजबूत करते (Strengthens Bones)
काजूमध्ये असलेले पोषक घटक हाडे मजबूत करतात. काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॉपर हाडे मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

 

5. कर्करोगावर देखील उपयोगी (Also Useful For Cancer)
काजू खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. Proanthocyanidins हा एक प्रकारचा फ्लेव्होनॉल आहे जो ट्यूमर पेशी वाढण्यापासून रोखतो. काजूमध्ये कॉपर (Copper In Cashew Nuts) आणि प्रोअँथोसायनिडिन देखील असते जे कर्करोग रोखण्यास मदत करते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss | do cashew nuts cause weight gain know the truth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत लावा 10 हजार रुपये! लवकर व्हाल लखपती, जाणून घ्या सविस्तर

 

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

 

Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR