Weight Loss Drink | केवळ खाण्यावर नव्हे, पिण्याकडेसुद्धा द्या लक्ष; तुम्हाला माहिती आहे का वेट लॉसची ‘ही’ जबरदस्त पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Drink | जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा सर्व प्रथम खाण्यावर लक्ष जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, खाण्यासोबतच पिण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. वजन कमी करण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे ते जाणून घेऊया. (Weight Loss Drink)

 

तज्ञांच्या मते, दररोज ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, तर वजन कमी करण्याच्या बाबतीत, पुरुषांनी १५ ग्लास आणि महिलांनी ११ ग्लास पाणी प्यावे. त्यांच्या मते पाण्यासोबतच लघवीच्या रंगाकडेही लक्ष द्या, जेणेकरून जास्त पाणी पिणे टाळता येईल. लघवी पूर्णपणे पांढरी होत असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करावे. (Weight Loss Drink)

 

पाणी कसे करते मदत
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे.
यामुळे तुम्ही जास्त अन्न खाणे टाळू शकता.
अन्न खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुम्ही जास्त अन्न खाणार नाही. अनेक वेळा लोक डिहायडड्ढेशनला भूक समजतात आणि नंतर जास्त अन्न खातात.

 

पाणी पिण्याचे इतर फायदे
पाणी हे आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाणी पचनसंस्थेद्वारे शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते.
यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
याशिवाय पोटफुगीची समस्या दूर होते. यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्ही खाण्यासोबतच पिण्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Weight Loss Drink | how much water you should drink for weight loss know this unique way to lose weight quickly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार