Weight Loss | रात्री ‘हे’ काम करून सुद्धा कमी करू शकता वजन, आहे खुप सोपे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss | तुम्हाला असे अनेक लोक भेटतील ज्यांना दोन छंद नक्कीच असतात. पहिला खाण्याचा (Eating) आणि दुसरा झोपण्याचा (Sleeping). जे लोक खाण्याचे शौकीन असतात, त्यांना विविध प्रकारचे मसालेदार, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, छोले-भटुरे इत्यादी खाणे खूप आवडते. जास्त खाल्ल्याने त्यांचे वजन वाढते, कारण या अन्नमध्ये पोषण खूप कमी असते आणि कॅलरीज खूप जास्त असतात. (Weight Loss)

 

दुसरीकडे, काही लोकांना झोपणे देखील आवडते. रात्री लवकर झोपून सकाळी उशिरा उठण्याबरोबरच काही जणांना दुपारीही झोप येते. पण जर असे म्हटले की, की जास्त झोप घेतल्याने वजनही कमी होते, तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे.

 

संशोधनानुसार, जे लोक दररोज एक तास जास्त झोप घेतात त्यांना वजन कमी करण्यात मदत होते. शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले असून त्यांनी हा दावा केला आहे. (Weight Loss)

काय म्हटले आहे संशोधनात
शिकागो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, दररोज रात्री एक तास जादा झोप घेतल्याने जास्त वजन असलेल्या लोकांचे वजन एका वर्षात सुमारे 3 किलो कमी होऊ शकते. या संशोधनात 21 ते 40 वयोगटातील 80 लोकांचा समावेश होता, जे दिवसातून 6.5 तासांपेक्षा कमी झोपत होते.

 

त्यांच्या झोपेचा पॅटर्न आधी स्मार्ट घड्याळाने तपासला गेला आणि नंतर त्यांच्या लघवीतील कॅलरीजचा मागोवा घेण्यात आला. संशोधनात असे आढळून आले की जे लोक दिवसातील 1.2 तासांपेक्षा जास्त म्हणजेच 1 तास 20 मिनिटे झोपतात त्यांनी 270 कमी कॅलरी वापरल्या.

 

असे केल्याने एका वर्षात 4 किलो (8-9 पौंड) वजन कमी करता येऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि वजन कमी करण्याच्या प्रोग्राममध्ये जादा झोप घेण्याचा सल्ला देण्यावर तज्ज्ञ भर देतात.
तो असेही म्हणतात की झोपायच्या आधी स्क्रीन टाइम मर्यादित केल्याने जास्त झोपायला मदत होते.

 

सध्या व्यायामाच्या अभावापेक्षा जास्त खाण्याने लठ्ठपणा वाढत आहे.
पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की पुरेशी झोप न घेतल्याने भूक वाढते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.

 

डॉ. एसरा तासाली (Esra Tasali) यांच्या मते, पुरेशी झोप दीर्घकाळ घेतली आणि ही सवय दीर्घकाळ टिकवली तर वजन कमी करता येते.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी उष्मांक कमी करण्याचे मार्ग शोधतात,
परंतु दररोज फक्त काही तास अतिरिक्त झोप घेतल्याने वजन कमी होऊ शकते.

3 वर्षात कमी करता येते इतके किलो वजन
शास्त्रज्ञांनी झोपेवर परिणाम करणार्‍या घटकांचे मूल्यांकन केले नाही, परंतु ज्यांना चांगली झोप लागली
त्यांनी झोपेच्या 30 मिनिटे आधी मोबाईल आणि टीव्हीकडे पाठ फिरवली, ज्यामुळे त्यांना चांगली झोप लागली.

 

डॉक्टर तासाली यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या झोपेतच फेरफार करण्यात आला.
पुढे असेही म्हटले आहे की जर झोपेचा पॅटर्न असाच ठेवला तर जास्त झोपणारे 3 वर्षात 12 किलो (26 पौंड) वजन कमी करू शकतात.

 

या संशोधनात झोपणार्‍यांनी कमी कॅलरी का वापरल्या याचा तपास केला गेला नाही, पण भविष्यात याचाही अभ्यास केला जाईल,
पण आधीच्या काही अभ्यासानुसार झोप पूर्ण न झाल्यामुळे भूक वाढते.

 

Web Title :- Weight Loss | extra 12 hours sleep may help you eat fewer calories and lose weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

 

Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’