Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वजन कमी केल्याने व्यक्तीची पर्सनॅलिटी रूबाबदार होते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. मात्र काही लोक वजन घटवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करतात, परंतु हे नुकसानकारक होऊ शकते. तसेच वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी एक्सपर्ट्स 7 खास पद्धतींवर जोर देतात. या पद्धतींनी घटवलेले वजन पुन्हा वाढण्याची शक्यता कमी असते.

प्रोटीन – तीनही प्रहरात आहारात प्रोटीनची मात्रा वाढवली पाहिजे. यामुळे मांसपेश मजबूत होतात आणि वजन घटते. चिकन, अंडी, बदाम, बी, भाज्या, डाळ, सोया आणि डेअरी प्रॉडक्ट याचे चांगले स्त्रोत आहेत.

फिजिकली अ‍ॅक्टिव्ह – नियमित एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. यामुळे फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहता.

जास्त कॅलरी घटवा – दिवसभरात तुम्ही जेवढ्या कॅलरी सेवन करता, त्यापेक्षा जास्त कमी करण्यावर फोकस करा. मात्र, उपाशी राहण्याची चूक करू नका. भूक लवकर लागू नये म्हणून फळे, भाज्या, कडधान्य, बदाम, बी, दाळी यांचे जास्त सेवन करा.

स्टेप्स वाढवा – दिवसभर खुर्चीवर बसून काम करत असाल तर ही सवय बदला. अधून मधून चालून या. स्टेप्स काउंट वाढवा.

योग्य झोप – रात्री 7 ते 8 तासांची चांगल्या गुणवत्तेची पूर्ण झोप घ्या. अल्कोहल सेवन बंद करा. झोपण्यापूर्वी एक कप दूधासह थोडा गुळ आणि जायफल खाल्ल्याने झोप चांगली येते.

भरपूर पाणी प्या – दिसभरात भरपूर पाणी प्या. वय, जेंडर आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीनुसार पाण्याचे आवश्यकता ठरवा.

घरचे जेवण – घरचे जेवण सर्वात पौष्टिक आणि लाभदायक असते. तेच सेवन करा. बाहेरचे आणि पॅकेटबंद फूड शक्यतो टाळा.