Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या ‘या’ 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Fruits | आज जगभरात लठ्ठपणा (Obesity) ही एक मोठी समस्या म्हणून उदयास येत आहे. लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करतात, तसेच आहारावर नियंत्रण (Dietary Control) ठेवतात, तरीही हट्टी लठ्ठपणापासून सुटका होत नाही. खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयी (Eating Habits) लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आहारात (Weight Loss Fruits) बदल करणे आवश्यक आहे.

 

वाढत्या लठ्ठपणाने तुम्ही हैराण असाल तर उन्हाळ्यात आधी तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन नियंत्रित करणे सोपे असते. प्रोटीन (Protein), फायबर (Fiber) आणि लो फॅट (Low Fat) पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित (Weight Control) होते. उन्हाळ्यात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फळांचे सेवन (Weight Loss Fruits) हा उत्तम पर्याय आहे.

 

फळांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने नियंत्रित होते आणि शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. तुम्हालाही वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर लो कॅलरी फळांचा (Low Calorie Fruit) आहारात समावेश करा ज्यामुळे शरीर हायड्रेट (Hydrate) राहते, तसेच वजन नियंत्रणात राहते. वजन नियंत्रित करणार्‍या 5 फळांबद्दल जाणून घेवूयात (Let’s Know About 5 Fruits That Control Weight)…

 

1. आहारात करा पपईचा समावेश (Include Papaya In Diet) :
वजन कमी करण्याच्या प्रवासात पपईचे सेवन (Eat Papaya) खूप प्रभावी ठरते. फायबरने समृद्ध पपई हे असेच एक आरोग्यदायी फळ आहे जे भूक शमवते आणि पचन (Digestion) देखील व्यवस्थित ठेवते. लो कॅलरी पपई मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवते आणि वजन नियंत्रित करते.

 

2. उन्हाळ्यात खरबूज खा (Eat Melon In Summer) :
व्हिटॅमिन सीने (Vitamin C) समृद्ध असलेली खरबूज इम्युनिटी मजबूत करते, तसेच वजन नियंत्रित करते. खरबूजमध्ये नैसर्गिक साखर (Natural Sugar) असते जी शरीराला ऊर्जा देते.

3. अननस वेगाने कमी करते वजन (Pineapple Rapidly Loses Weight) :
आंबट गोड अननस चवीला तितकेच चविष्ट आहे जितके ते आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial For Health) आहे.
ते खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते, तसेच वजन नियंत्रित राहते.
अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांनी (Anti-inflammatory Properties) समृद्ध, अननस मेटाबॉलिज्म वाढवते आणि जलद वजन कमी करण्यात प्रभावी ठरते.

 

4. कलिंगडने वजन करा नियंत्रित (Weight Controlled By Watermelon) :
कलिंगड (Watermelon) खायला जेवढे चवीला आहे तेवढेच ते आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.
कलिंगडमध्ये जीवनसत्त्वे ए (Vitamins A), बी6 (B6) आणि सी (C) तसेच अ‍ॅमिनो अ‍ॅसिड (Amino Acid)
आणि डाएट्री फायबर (Dietary Fiber) असते जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

 

कलिंगड खाल्ल्याने वजन लवकर नियंत्रित होते आणि उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते.
याचे सेवन केल्याने पोट भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही.

 

5. लिचीने वजन नियंत्रित करा (Control Weight With Lychee) :
लिची (Lychee) हे असे फळ आहे जे उन्हाळ्यात आढळते. ते वजन झपाट्याने कमी करते.
याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि भूक नियंत्रित राहते.
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध, लीची इम्युनिटी मजबूत करते आणि निरोगी ठेवते.

 

6. संत्र्याचे करा सेवन (Eat Oranges) :
उन्हाळ्यात संत्र्याचे (Orange) सेवन करणे चांगले असते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध संत्री आरोग्याची काळजी घेते, तसेच वजन वेगाने नियंत्रित करते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Fruits | if you want to get rid of weight so include these 5 summer fruits in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ananya Panday Bold Photo | असा ड्रेस घालून अनन्या पांडे पोहचली पुरस्कार सोहळ्यात, तिला पाहून चाहते झाले ‘घायाळ’

 

Radhe Shyam Box Office Collection | बॉलिवूड चित्रपट राधे श्यामने दोन दिवसांत केली तब्बल 100 कोटी रूपयांची कमाई

 

Weight Gain | लाख प्रयत्नानंतर सुद्धा वाढत नसेल वजन तर असू शकते ‘झिंक’ची कमतरता, ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन