Weight Loss Home Remedy | ‘या’ 4 ज्यूसमुळे तुमचं वजन लवकर कमी होईल; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Home Remedy | सलग अनेक तास एकाच ठिकाणी बसून मीटिंग घ्यायला किंवा डेस्क जॉब करणार्‍यांच्या कंबरेची चरबी वाढायला वेळ लागत नाही. या लोकांचा लठ्ठपणा (Obesity) खूप वेगाने वाढतो आणि पोटाची चरबीही (Belly Fat) वाढू लागते. अशा परिस्थितीत या चार फळांचा आणि भाज्यांचा रस तुमचे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो (Weight Loss Home Remedy).

 

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, नियमित व्यायाम आणि निरोगी आहार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भाज्या आणि फळांच्या सेवनानेही वजन कमी होण्याच्या मदतीमुळे फायदा होऊ शकतो (Weight Loss Home Remedy).

 

प्या या 4 फळभाज्यांचा रस (Drink These 4 Fruits And Vegetables Juice) –

डाळिंबाचा रस (Pomegranate Juice) :
डाळिंबाच्या रसाचं सेवन झटपट ऊर्जा आणि पोषण मिळवण्यासाठी खुप फायदेशीर मानलं जातं. डाळिंबाचा रस वजन कमी करण्यासही मदत करतो. या फळात विविध अँटिऑक्सिडेंट्स आणि पॉलिफेनॉलसारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात. डाळिंबाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होतेच, शिवाय अशक्तपणाही दूर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते (Pomegranate Juice For Weight Loss).

 

कार्ल्याचा रस (Bitter Melon Juice) :
वजन कमी करण्याच्या दृष्टीने कारले ही एक गुणकारी भाजी मानली जाते. कार्ल्याचा रस हे बर्‍याच लोकांचे आवडते वजन कमी करण्याचे पेय आहे. कारले ही एक भाजी आहे. जी पाचनशक्ती प्रक्रिया (Digestive Process) सुधारते. कारले ही कमी कॅलरीची भाजी असून अ‍ॅसिडिटीची समस्याही यातून दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी कार्ल्याचा रस प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होऊ शकतो.

गाजराचा रस (Carrot Juice) :
आहारातील फायबरयुक्त भाज्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. गाजरात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट लवकर भरतं आणि नंतर खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय गाजरात लोह, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी (Iron, Beta Carotene, Potassium And Vitamin C) देखील आढळतात. हे सर्व घटक वजन कमी करण्यास मदत करतात.

 

गूळ आणि काकडीचा रस (Jaggery And Cucumber Juice) :
काकडी आणि खोबर्‍यासारख्या रसाळ भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं.
म्हणूनच त्यांचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
या भाज्यांमध्ये फायबर आणि पाणी भरपूर प्रमाणात असते.
यासोबतच या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबरही असतात.
या सर्व घटकांच्या मदतीने पाचनशक्तीचा सुधारू शकते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Home Remedy | weight loss home remedy these four juice will reduce your fat fast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचा आणि केस होतील सुंदर; जाणून घ्या

 

Kidney Cure | ‘या’ गोष्टींमुळे किडनीचं होऊ शकतं गंभीर नुकसान; जाणून घ्या

 

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या