Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Kadha | वाढत्या वजनामुळे व्यक्तिमत्व तर बिघडतेच शिवाय अनेक आजारांनाही निमंत्रण मिळते. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम करतात आणि आहारावरही नियंत्रण ठेवतात, तरीही त्यांचे वजन कमी (Weight Loss) होत नाही. असे लोक वजन कमी करण्यासाठी अयोग्य पद्धतींचा अवलंब करतात, काही बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric Surgery) करतात आणि काही लिपोसक्शन (Liposuction) करतात, ज्याद्वारे शरीरातील अतिरिक्त चरबी (FAT) कमी केली जाते. वजन कमी करण्याची ही पद्धत आरोग्यासाठी चांगली (Weight Loss Kadha) नाही.

 

वजन कमी करण्यासाठी काहीजण उपवास देखील करता आणि आहारावर नियंत्रण (Dietary Control) ठेवता, तरीही हट्टी लठ्ठपणापासून (Obesity) सुटका होत नाही, तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सुचविलेल्या काढ्याचे सेवन करावे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून (Ayurvedic Medicinal Plants) बनवलेला हा काढा वजन झपाट्याने कमी करतो, शिवाय इम्युनिटी देखील मजबूत करते.

 

काढ्याचे सेवन (Weight Loss Kadha) करून, निरोगी मार्गाने चरबीपासून मुक्त होऊ शकता.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदिक काढा कसा बनवायचा ते जाणून घेऊया (Let’s Know How To Make Ayurvedic Kadha For Weight Control).

 

1. दालचिनी आणि अश्वगंधा यांचा काढा (Cinnamon And Ashwagandha Kadha) :
दालचिनी (Cinnamon) आणि अश्वगंधा (Ashwagandha) वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
सर्व प्रथम दालचिनी घेऊन त्याची पावडर बनवा. आता गॅसवर एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनी पूड टाकून नीट ढवळून घ्या.
आता अश्वगंधाची पाने घ्या आणि ती तोडून पाण्यात टाका आणि 10 मिनिटे चांगली शिजवा.

 

काही वेळ शिजवल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल आणि सुगंधही चांगला येईल. हे पाणी गाळून चहाप्रमाणे प्यायल्यानंतर लठ्ठपणा दूर होईल.

2. लिंबू, आले आणि हळद यांचा काढा (Lemon, Ginger And Turmeric Kadha) :
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुसरी पद्धत देखील वापरून पाहू शकता.
वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांचा हा काढा बनवण्यासाठी थोडी हळद, थोडे आले, लिंबू लागेल.
सर्वप्रथम हळद आणि आले बारीक करून त्याचा रस काढा. लक्षात ठेवा, दोन्हीचा रस वेगवेगळा काढा.

 

आता हा काढा बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा हळद, एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा.
आता त्यात गरम पाणी घालून नीट ढवळून घ्या, तुमचा काढा तयार आहे.
जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही काढ्यामध्ये एक चमचा मध देखील टाकू शकता.
अशाप्रकारे, या काढ्याचे सेवन करून वजन निरोगी पद्धतीने नियंत्रित करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Kadha | ayurvedic kadha for weight loss and strong immunity know the recipe from baba ram dev

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Cloves | Liver, डायबिटीज, पोट, दात आणि Bones साठी जबरदस्त आहे ‘ही’ एक घरगुती गोष्ट, Sugar Level करते कंट्रोल

 

Gular Benefits | पोटदुखीवर उंबराचे सेवन फायदेशीर, अशक्तपणा दूर होतो

 

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश