Weight Loss – Protein Intake | वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही केवळ प्रोटीन डाएट तर घेत नाही ना? व्हा सावध, वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’चा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss – Protein Intake | वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करण्यात रस आहे, त्यांनी आपल्या आहारात प्रोटीनचा (Protein Intake) समावेश करावा. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की आपल्या आहारात प्रोटीनचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. (Weight Loss – Protein Intake)

 

वजन नियंत्रित ठेवल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते, तर सतत वजन वाढल्याने हृदयविकारासह हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड शुगरचा धोकाही वाढतो. पण जे वजन कमी करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन घेतात, त्यांनी सावध राहावे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की जास्त प्रोटीन खाल्ल्याने हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढतो. याबाबत सविस्तर माहिती घेवूयात –

 

संशोधनात झाला खुलासा :
सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. बाबक राजानी आणि त्यांच्या टीमने उंदरांवर हे संशोधन केले आहे. संशोधकांनी काही उंदरांना हाय फॅटसह (High Fats) हाय प्रोटीन (High Protein) डाएटवर (Diet) ठेवले, तर उर्वरित उंदरांना लो प्रोटीनयुक्त डाएटवर ठेवले. (Weight Loss – Protein Intake)

 

या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, ज्या उंदरांना हाय प्रोटीन डाएट देण्यात आला होता त्यांच्यामध्ये इतरांपेक्षा 30 टक्के जास्त आर्टियल प्लेक्स आढळून आले. अशा स्थितीत, असे म्हणता येईल की हा प्रोटीन डाएट हृदयाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात.

वाढू शकतो धोका :
हाय प्रोटीनमध्ये आढळणारे एक विशिष्ट अमिनो अ‍ॅसिड मॅक्रोफेजच्या असामान्य वाढीसाठी जबाबदार आहे
(एक प्रकारचा WBC जे आर्टियल प्लेकशी लढण्यासाठी उपयोगी पडतो).
यामुळे त्याच्या कार्यक्षमता प्रभावित होते आणि आर्टियलमधून प्लेक काढण्यास मॅक्रोफेजेस असमर्थ ठरतो.

 

अशा स्थितीत, प्लेकभोवती मोठ्या प्रमाणात मृत पेशी जमा होतात, ज्यामुळे ते अस्थिर होते आणि तुटण्याच्या स्थितीत येते.
या टप्प्यावर, प्लेकमधून ब्लड फ्लो होतो तेव्हा, वाढत्या तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

 

केवळ इतका घ्या प्रोटीन आहार :
प्रोटीन शरीराला ताकद देते, मात्र मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या सल्ल्यानुसार, निरोगी व्यक्तीने दररोज 50 ग्रॅम प्रोटीन खाणे आवश्यक आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Weight Loss – Protein Intake | weight loss only protein diet for lose weight be careful risk of heart attack may increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !

 

How To Prevent Ageing | अवलंबा ‘या’ 5 गोष्टी, त्वचेवर दिसणार नाही वयाचा परिणाम

 

YouTube Shorts Earning | ‘युट्यूब’चे ‘हे’ फीचर आहे श्रीमंत बनण्याचा जबरदस्त मार्ग ! घरबसल्या दर महिना करा 7.5 लाखापर्यंत कमाई, येथे जाणून घ्या कसे