Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं. त्यासाठी काहीजण आपली शरीर रचनेवरही काम करतात. (Weight Loss Remedies) जसं की, वजन जास्त असेल, तर कमी करणे आणि ते करण्यासाठी काही लोक व्ययाम करतात. तर काही डायट प्लॅन (Diet Plan) करतात. परंतू एवढं सगळं करूनही काहींच वजन कमी होत नाही.(Weight Loss Remedies) जर तुम्हालाही हीच समस्या अलेस, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या समस्येवरचा उपाय सांगणार आहोत (Change 5 Habits If Belly Fat Not Reducing After Daily Exercise).

 

1. अनहेल्दी आहार (Unhealthy Food)
पोटाची चरबी वाढवण्यामध्ये अनहेल्दी पदार्थ सर्वात जास्त योगदान देतात. पिष्टमय कार्बोहायड्रेट्स आणि खराब कोलेस्टेरॉलने भरपूरअन्न घेतल्याने तुमचे शरीर वाढते. म्हणून तुम्ही खाण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, प्रथिनेआणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ समाविष्ट करणे सुरू केले पाहिजे. कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केल्याने तुम्हाला खूप मदत होऊ शकते. (Weight Loss Remedies)

 

2. धूम्रपान (Smoking)
हल्लीची बहुतांश तरूण पिढी धूम्रपानाच्या व्यसनाचे बळी झाले आहेत. या वाईट सवयीमुळे तुमच्या पोट आणि आतड्यांवरील चरबीवाढते. म्हणून, जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल, तर धूम्रपान करणे थांबवा.

 

3. ताण (Stress)
तणाव हा सर्वात हानिकारक घटकांपैकी एक आहे. जो आपल्या एकूण आरोग्यावर अशा प्रकारे परिणाम करू शकतो ज्याची आपणकल्पना देखील करू शकत नाही. विज्ञानानुसार, जेव्हा तुमच्या कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते तेव्हा तुमच्या पोटातीलचरबीची पातळी वाढते. तुमची तणावाची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान (Meditation), योगाचा (Yoga) प्रयत्न करू शकता.

4. बिअर सेवन (Beer)
बिअरमध्ये भरपूर कॅलरीज (Calories) आणि कार्ब्स (Carbs) असतात.
जर तुम्ही जास्त प्रमाणात बीअरचे सेवन करत असाल आणिकोणताही व्यायाम करत नसाल तर त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी (Fats) वाढू शकते.

 

5. पाणी कमी पिणे (Drink Less Water)
बर्‍याच संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरेसे पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यासमदत होते.
पण जेव्हा तुम्ही पाणी पीत नाही, तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शक्य तितके पाणी प्या आणि
साखरयुक्तपेयांपासून दूर रहा कारण ते कॅलरींनी परिपूर्ण आहेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Weight Loss Remedies | change 5 habits if belly fat not reducing after daily exercise sleep diet stress drink water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

 

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय