Weight Loss : तुम्हीही रिकाम्या पोटी खात नाही ना ‘या’ 5 गोष्टी ? ‘या’ छोट्याशा चुकीने होईल मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेतात. दिवसाची सुरुवात तुम्ही काय खाऊन करता, यावरसुद्धा खूप काही अवलंबून आहे. खाण्या-पिण्याच्या काही वस्तू रिकाम्या पोटी घेतल्यास अ‍ॅसिडिटी आणि जळजळसारख्या समस्या होतात. सोबतच तुमचे वजन कमी करण्याचे स्वप्नसुद्धा भंग होऊ शकते. कोणत्या वस्तू सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत ते जाणून घेऊयात…

आंबट फळे –
कधीही रिकाम्या पोटी आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीरात अ‍ॅसिड खूप जास्त तयार होते. फळात फायबर भरपूर असते. यामुळे ती रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटावर अतिरिक्त भार पडतो. याच्याशिवाय दिवसाची सुरुवात मनुके किंवा भिजवलेल्या बदामने केली पाहिजे.

सॉफ्ट ड्रिंक –
सोडा किंवा कोणतेही सॉफ्ट ड्रिंक रिकाम्या पोटी सेवन करू नये. यामुळे गॅसची समस्या होते. लठ्ठपणा वाढतो. याऐवजी लिंबू पाणी प्या.

मसालेदार जेवण –
सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्या होतात. नाश्ता नेहमी हलका आणि साधा करा.

थंड पेय –
दिवसाची सुरुवात थंड पेयाने केल्याने पचनक्रिया मंदावते. याऐवजी कोमट पाण्यात लिंबू, आल्याचा चहा घ्या.

कच्च्या भाज्या –
वजन कमी करण्यासाठी अनेकजण हिरव्या भाज्या आणि सलाद घेतात. या वस्तू कच्चा आणि रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटाच्या समस्या होतात.